Donald Trump Tariff News : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी भारतावर कर लादण्याचा सपाटाच लावलाय. २५ टक्क्यांपासून सुरू झालेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. आता या कराचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली.
कर लादल्यानंतर, वॉलमार्ट, अमेझॉन ( Amazon ), टार्गेट आणि गॅप यासारख्या प्रमुख अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांनी आता भारतातील ऑर्डर रोखून ठेवल्या आहेत. याची भीती आधीच भारतीयांना होती. सध्या तेच घडत आहे. कर वाढवण्याचा परिणाम दिसायला सुरूवात झाली.
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
भारतीय निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत कपड्यांची निर्यात थांबवण्याची विनंती करणारे पत्रे आणि ईमेल मिळालेत.
खर्च ३५ टक्क्यांनी वाढेल
अमेरिकन कंपन्यांना भारतीय निर्यातदारांना टॅरिफमुळे वाढलेल्या खर्चाचा भार सहन करावा असं वाटतंय. टॅरिफमुळे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वेल्सपन लिव्हिंग, गोकलदास एक्सपोर्ट्स, इंडो काउंट आणि ट्रायडंट सारखे भारतातील प्रमुख निर्यातदार त्यांच्या ४० ते ७० टक्के वस्तू अमेरिकेत विकतात. ( Donald Trump )
कापड उद्योगावर परिणाम होणार
आता अमेरिकेला जाणारे ऑर्डर थांबवल्यामुळे व्यापारात ४० ते ५० टक्के घट होऊ शकते. भारतातून सर्वात जास्त कपडे अमेरिकेत निर्यात केले जातात. पण टॅरिफमुळे भारताचे ऑर्डर बांगलादेश आणि व्हिएतनामला जाऊ शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादलाय. बांगलादेश आणि व्हिएतनामवर तो फक्त २० टक्के आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला भारताने विरोध केला होता. हा निर्णय अतार्किक असल्याचे म्हटले होते, पण, ट्रम्प त्यावर ठाम आहेत. (Tariff News )