Join us

‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:05 IST

Donald Trump India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास बऱ्याच काळापासून मनाई करत आहेच. आता अमेरिकन प्रशासनानं भारताला शुल्क लादण्याची धमकी दिली आहे.

Donald Trump India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास बऱ्याच काळापासून मनाई करत आहेच. आता अमेरिकन प्रशासनानं भारताला शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला अधिकाधिक स्थानिक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केलंय. याशिवाय रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेतही भारतीय प्रशासनानं दिले आहेत.

धमकीचा परिणाम नाही

ट्रम्प यांच्या धमकीनंतरही चीनप्रमाणेच भारतानंही रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. भारताच्या रिफायनरींना त्यांच्या पसंतीच्या स्त्रोतांकडून तेल खरेदी करण्याची परवानगी आहे, परंतु भारत सरकारनं रशियन तेल खरेदी थांबवण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५ टक्के शुल्क लादल्यानंतर आता भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवल्यास आणखी कारवाई करू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?

अमेरिकेला काय समस्या?

अमेरिका सरकार भारत आणि चीनसह इतर देशांवर रशियाकडून कच्चं तेल खरेदी करू नये यासाठी दबाव आणत आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धात रशियाला कमकुवत करण्यासाठी हे आवश्यक आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणायचाय. केवळ अमेरिकाच नाही तर पाश्चात्य देशांचंही म्हणणे आहे की रशियाकडून कच्चं तेल खरेदी करून तो आर्थिकदृष्ट्या मजबूत होतोय.

गेल्या आठवड्यातही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. विकसनशील देशांच्या ब्रिक्स गटात सामील झाल्यामुळे आणि रशियाशी असलेल्या संबंधांमुळे भारताची मृत अर्थव्यवस्था कोसळू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हटल्यानंतरही या मुद्द्यावरही बराच गदारोळ झाला.

भारताला इशारा

रविवारी, ट्रम्प यांचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी भारतावर मोठं शुल्क लादण्याचा इशारा दिला. "अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भारत आणि त्याच्या पंतप्रधानांशी मजबूत संबंध हवे आहेत. परंतु जर भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत राहिला तर त्यांच्यावर मोठं शुल्क लादलं जाऊ शकतं," असं ते म्हणाले.

भारत-अमेरिकेतील वाढता तणाव

भारत आणि अमेरिकेतील तणाव केवळ रशियामुळेच नाही तर अनेक मुद्द्यांवरून वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारताला अनेक वेळा टॅरिफ किंग म्हटलंय. अमेरिका भारताकडे त्यांच्या दुग्धजन्य आणि कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठ उघडण्याची मागणी करत आहे. परंतु भारत याचा सतत विरोध करत आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदीटॅरिफ युद्धरशिया