Join us

QR Code द्वारे पैसे पाठवताना करू नका 'ही' चूक, होईल मोठं नुकसान; अशी पटवा खऱ्या-खोट्याची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:54 IST

QR Code Scam : आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो.

QR Code Scam : आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून क्यूआर कोडचा पर्याय समोर आला आहे. आपण भाजी खरेदीसाठी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी प्रत्येक छोट्या पेमेंटसाठी क्यूआर कोड वापरतो. गुगल पे, पेटीएम आणि फोनपे सारख्या यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे सहज स्कॅन करून पेमेंट केलं जाऊ शकतं. हे करणं अतिशय सोपं आहे, क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.

परंतु कधीकधी पडताळणी शिवाय क्यूआर कोड स्कॅन करणंदेखील धोकादायक ठरू शकते. अलीकडे क्यूआर कोड स्कॅनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे क्यूआर कोडची जागा बनावट कोडसह स्कॅमर्सनं घेतली आहे. असा क्यूआर कोड स्कॅन पैसे थेट स्कॅमर्सच्या खात्यात जातात. अशावेळी खरे आणि खोटे क्यूआर कोड कसे ओळखायचे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्व क्यूआर कोड सारखेच दिसतात, त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

साउंड बॉक्सचा वापर

बनावट क्यूआर कोड टाळण्यासाठी पेमेंट रिसीव्हर आणि पेमेंटर दोघांनीही सतर्क राहणं आवश्यक आहे. रिसीव्हरने पेमेंट मिळवण्यासाठी करण्यासाठी साउंड बॉक्स वापरणं आवश्यक आहे. यासोबतच जर कोणी बनावट क्यूआर कोडनं पैसे भरले तर ते वेळीच ओळखता येईल.

नावाची पडताळणी नक्की करा

जर तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करत असाल तर पेमेंट करण्यापूर्वी दुकान किंवा मालकाच्या नावाची पडताळणी करणं आवश्यक आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर स्क्रीनवर दुकान मालकाचं नाव दिसतं. स्क्रीनवर दिसणारं नाव दुकानाच्या किंवा व्यक्तीच्या नावाशी जुळत नसेल तर पेमेंट करणं टाळा आणि सावधगिरी बाळगा. यामुळे तुम्हाला फसवणुकीपासून वाचवता येईल.

चुकीचा क्यूआर कोड कसा ओळखावा

पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅनर संशयास्पद वाटत असेल तर गुगल लेन्सचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन करावा. यामुळे आपल्याला यूआरएल कोणत्या साइटवर रिडायरेक्ट करत आहे हे समजतं, जेणेकरून आपण फसवणूक टाळू शकता. यामुळे जर तुम्हाला कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही.

टॅग्स :पैसाधोकेबाजी