Dollar vs Rupees: गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलन रुपयाच्या किमतीत सुरू असलेल्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सहा पैशांची वाढ नोंदवण्यात आली आणि याचबरोबर भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८.७० च्या पातळीवर पोहोचला. यापूर्वी, गुरुवारी रुपया मर्यादित कक्षेत व्यवहार करत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी वाढून ८८.६८ वर बंद झाला होता. एच१-बी व्हिसाचे शुल्क वाढणं आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढीमुळे देखील रुपयावर दबाव आला होता.
गुरुवारीही रुपयामध्ये घसरण
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराबाबत (ट्रेड डील) सुरू असलेल्या चर्चेबाबतचे संमिश्र संकेत आणि अमेरिकेच्या व्याजदरात पुढील कपातीबाबतच्या अनिश्चिततेमुळे शुक्रवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे आणि एच१-बी व्हिसाचं शुल्क वाढवल्याच्या चिंतेमुळे, तसंच बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स घसरून बंद झाला, ज्यामुळे सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. तर, एनएसई निफ्टीही घसरणीसह बंद झाला.
रुपयामध्ये आतापर्यंत आलेली घसरण
आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी, सोमवार, २५ सप्टेंबर रोजीही रुपया डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी घसरून ८७.६० वर बंद झाला होता. परंतु, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया १४ पैशांच्या वाढीसह उघडला होता. चालू आर्थिक वर्षात रुपया आतापर्यंत २.१५ टक्के आणि २०२५ मध्ये २.३० टक्के घसरला आहे. परंतु, ऑगस्टमध्ये, त्यानं डॉलरच्या तुलनेत सुमारे ०.२० टक्क्यांची वाढ देखील नोंदवली होती.
घसरणीची कारणं
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष संशोधन विश्लेषक (कमोडिटी आणि चलन) जतिन त्रिवेदी यांच्या मते, विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्सची सातत्यानं विक्री करत आहेत. ते भारतीय बाजारपेठेत निव्वळ विक्रेते बनले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचं मत (धारणा) कमकुवत झालंय. याशिवाय, भारतावरील अमेरिकेच्या शुल्क (टॅरिफ) धोरणाबद्दलच्या चिंतेनं देखील रुपयामध्ये वाढ होण्याची शक्यता कमी केली आहे.
सॅलरीचा हिशेब काय?
अशा परिस्थितीत, समजा या वर्षाच्या सुरुवातीला एखादी व्यक्ती अमेरिकेत $५००,००० ची नोकरी करत असेल, तर रुपयामध्ये २.३० टक्के घसरण होण्यापूर्वी भारतात त्या व्यक्तीचं वेतन सुमारे रु. ४३,३३,४८४ होतं. आता, सप्टेंबरपर्यंत रुपयामध्ये झालेल्या २.३० टक्के घसरणीमुळे, भारतात तिचं वेतन १,०२,०१६.५ नं वाढून सुमारे रु. ४४,३५,५०० होईल. म्हणजेच, या वर्षी कोणतीही वाढ न होताही, त्या व्यक्तीनं भारतात आपल्या वेतनात एक लाखांहून अधिकची वाढ मिळवली आहे.
Web Summary : The rupee's recent depreciation against the dollar has increased salaries for those earning in dollars. A $500,000 salary now yields over ₹1 lakh more due to the 2.3% rupee decline this year, even without a raise. The rupee's fluctuations are influenced by foreign investment and US tariff concerns.
Web Summary : डॉलर के मुकाबले रुपये की हालिया गिरावट से डॉलर में कमाने वालों के वेतन में वृद्धि हुई है। इस साल रुपये में 2.3% की गिरावट के कारण $500,000 के वेतन से अब बिना वेतन वृद्धि के ₹1 लाख से अधिक की आय होती है। रुपये में उतार-चढ़ाव विदेशी निवेश और अमेरिकी शुल्क चिंताओं से प्रभावित है।