Join us

क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:05 IST

Credit Score Drop Reasons: लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास ते बंद करण्याचा विचार करतात, पण आपला क्रेडिट स्कोअर खराब होईल अशी भीती त्यांच्या मनात असते. क्रेडिट कार्ड बंद केल्यानं क्रेडिट स्कोअर खराब होतो का, हे आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

Credit Score Drop Reasons: क्रेडिट कार्डमुळे आयुष्य सोपं होतं हे खरं, पण काहीवेळा ते अडचणींचं कारणही बनू शकतात. अशा परिस्थितीत, काही लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास ते बंद करण्याचा विचार करतात, पण आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) खराब होईल अशी भीती त्यांच्या मनात असते. क्रेडिट कार्ड बंद केल्यानं क्रेडिट स्कोअर खराब होतो का, हे आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

क्रेडिट स्कोअर कसा कमी होतो-वाढतो?

तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर (Credit Utilization Ratio) अवलंबून असतो, म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या किती भागाचा वापर करता. जर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद केलं, तर त्या कार्डचे संपूर्ण क्रेडिट संपेल. यामुळे तुमचं एकूण क्रेडिटही कमी होईल. क्रेडिट कमी झाल्यामुळे क्रेडिट रेशोवर परिणाम होतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो.

किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

चला उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमच्याकडे दोन क्रेडिट कार्ड आहेत आणि दोघांची एकूण मर्यादा मिळून ₹२ लाख आहे। तुम्ही यापैकी ₹५०,००० खर्च केले आहेत. तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो २५ टक्के असेल. आता जर तुम्ही यापैकी एक कार्ड बंद केले, ज्याची मर्यादा ₹१ लाख होती, तर तुमची एकूण उपलब्ध मर्यादा कमी होऊन ₹१ लाख राहील. पण खर्च तर ₹५०,००० च आहे. आता तुमचा क्रेडिट रेशो ५० टक्के होईल. बँक किंवा एनबीएफसी (NBFC) याला धोकादायक मानतात, कारण तुम्ही तुमच्या मर्यादेचा मोठा भाग वापरत आहात. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो.

क्रेडिट हिस्ट्रीचं एज देखील कमी होतं

जर तुम्ही तुमचं कोणतंही जुनं कार्ड बंद केलं, तर त्यामुळे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचं एज देखील कमी होतं. वास्तविक, तुमच्या क्रेडिट कार्डचं वय देखील तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतं. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बंद केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर देखील खाली येऊ शकतो, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Closing credit card impacts credit score? Know these important things.

Web Summary : Closing a credit card can lower your credit score by reducing your overall available credit and increasing your credit utilization ratio. Older cards also contribute to credit history age, further impacting the score upon closure.
टॅग्स :बँकपैसा