Join us

भारतात १०-२० रुपयांना मिळणाऱ्या पाणीपुरीची प्लेट अमेरिकेत कितीला मिळते माहितीये? किंमत पाहून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:21 IST

पाणीपुरी हे संपूर्ण भारतात अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. देशातील प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात पाणीपुरी हा पदार्थ सहज उपलब्ध असतो. त्याचबरोबर पाणीपुरी देशातील बहुतेक लोकांना खूप आवडते.

पाणीपुरी हे संपूर्ण भारतात अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. देशातील प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात पाणीपुरी हा पदार्थ सहज उपलब्ध असतो. त्याचबरोबर पाणीपुरी देशातील बहुतेक लोकांना खूप आवडते. कदाचित फार क्वचितच लोक असतील ज्यांना पाणीपुणे आवडत नसेल. भारताची पाणीपुरी आता अमेरिकेतही लोकप्रिय होत आहे. अमेरिकेतील लोकांनाही पाणीपुरी खाण्याची खूप आवड आहे, पण तुम्हाला माहितीये आहे का अमेरिकेत पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत काय आहे. चला जाणून घेऊया.

पैसे पाहून तोंड उघडंच राहिल! NPS मध्ये महिन्याला ₹५००० गुंतवले तर Retirement वर किती पेन्शन मिळणार?

अमेरिकेत पाणीपुरी

भारतासह अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आता पाणीपुरीची विक्री होत आहे. पाणीपुरीचे किऑस्क आता अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत. याशिवाय अमेरिकेतील काही रेस्टॉरंट्समध्येही पाणीपुरी मिळत आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत शेअर करत आहेत, त्यानुसार अमेरिकेत पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ७ ते १० डॉलरच्या दरम्यान आहे.

अमेरिकेत पाणीपुरीची किंमत काय?

अमेरिकेत पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत ७ ते १० डॉलर्स म्हणजेच रुपयांत पाहायचं झाल्यास ६०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. पाणीपुरीच्या एका प्लेटमध्ये ६ ते ८ पाणीपुरी दिल्या जातात. यासोबतच अमेरिकेतील दुकानांमध्ये पाणीपुरीचे एक पॅकेट देखील उपलब्ध आहे. या पॅकेटमध्ये ५० पाणीपुरी आणि मसाला मिळतो. या पॅकेटची किंमत सुमारे ५ डॉलर्स म्हणजेच सुमारे ४०० रुपये इतकी आहे.

टॅग्स :अमेरिकाभारत