Join us

रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम तुम्हाला माहीत आहे का? होईल मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 01:08 IST

महत्वाचे म्हणजे, आपण आपले तिकिट केवळ एकदाच ट्रान्सफर करू शकता...

रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. जर आपणही रेल्वेचे नियमित प्रवासी असाल, तर रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम आपल्याला माहीत असायलाच हवा. कारण रेल्वेच्या तिकिट बुकिंगसंदर्भातील या खास नियमाचा फायदा थेट प्रवाशांना होतो. आज आम्ही आपल्याला रेल्वेच्या एका अशा नियमासंदर्भात माहिती देत आहोत, ज्यानुसार आपण आपले तिकीट दुसऱ्यालाही ट्रान्सफर करू शकता. अर्थात हे तिकीट केवळ कुटुंबातील सदस्य, जसे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांनाच ट्रान्सफर करता येईल.

असे करा ट्रान्सफर -तिकिट ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला संबंधित तिकिटाची प्रिंटआऊट आणि ज्या व्यक्तीच्या नावाने ते ट्रान्सफर करायचे आहे त्या व्यक्तीचा आयडी प्रूफ, जसे आधार कार्ड घेऊन जवळच्या रेल्वे स्थानकात जावे लागेल. हे आपल्याला तिकिट ट्रान्सफरसाठी केलेल्या अर्जासोबत द्यावे लागेल.

24 तास आधी करावे लागते ट्रान्सफर -रेल्वेच्या नियमांनुसार, संबंधित तिकिट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला 24 तास आधी अप्लाय करवे लागेल. महत्वाचे म्हणजे, आपण आपले तिकिट केवळ एकदाच ट्रान्सफर करू शकता. ते वारंवार दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येत नाही. 

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वे