Join us

तुमच्याकडेही आहे का सरकारचं 'आयुष्यमान कार्ड', पाहा कुठे आणि किती रुपयांत होतात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:09 IST

सरकार वेळोवेळी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. ज्याद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत केली जाते.

सरकार वेळोवेळी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. ज्याद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना मदत केली जाते. कोरोनानंतर लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत, ज्यावर उपचार करणं प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला उपचार मिळणं सोपं व्हावं यासाठी सरकारनं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब घटकातील लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. पण याद्वारे कोणत्या आजारांवर उपचार केले जातात ते आपण जाणून घेऊ.यावर मोफत उपचारया योजनेंतर्गत देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना, कॅन्सर, किडनी, हार्ट, डेंग्यू, मलेरिया, डायलिसिस, गुडघे, मोतीबिंदू आणि अन्य गंभीर आजारांवर उपचार केले जातात. कोणत्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातात हे कसं माहित करायचं हे पाहू.असं शोधा रुग्णालयया योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आयुष्यमान भारतच्या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती, म्हणजेच आजार, मोबाइल नंबर आणि कोणत्या परिसरात तुम्ही राहता हे टाकावं लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक यादी येईल. या ठिकाणी रुग्णालयाचं नाव आणि अँड्रेस लिहिलेला असेल.कोण घेऊ शकतं फायदा?कच्च्या घरात राहणारे लोक, भूमिहीन लोक, अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर, दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार फक्त या लोकांनाच आहे. जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊ शकता.

ही आहे प्रोसेस

  • या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करा.
  • यानंतर मोबाइल आणि कॅप्चा कोड टाका.
  • तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो या ठिकाणी टाका.
  • त्यानंतर नवं पेज ओपन होईल. यानंतर तुम्ही तुमचं राज्य निवडा.
  • माव, नंबर, रेशन कार्ड आणि अन्य डिटेल्स भरा.
  • यानंतर राइट साईडला Family Member मध्ये टॅब करून तुम्ही लाभार्थीचं नावही अॅड करू शकता.
  • हे सबमिट करा. त्यानंतर सरकार तुम्हाला आयुष्यमान कार्ड जारी करेल.
  • यानंतर तुम्ही ते डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकाल.
टॅग्स :सरकारआरोग्य