Join us

Dixon Technologies Shares: ४१% घसरू शकतो 'हा' चर्चेतील शेअर, विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग; एक्सपर्टचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:26 IST

Dixon Technologies Shares: आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ११ टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी कंपनीचा शेअर इंट्राडे नीचांकी पातळीवर १५,७०७.३० रुपयांवर घसरला.

Dixon Technologies Shares: आज ट्रेडिंग दरम्यान डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ११ टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर इंट्राडे नीचांकी पातळीवर १५,७०७.३० रुपयांवर घसरला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होऊ शकते. ब्रोकरेज कंपनीनं कंपनीच्या तिमाही निकालानंतर मूल्यांकनाच्या चिंतेचा हवाला दिला.

काय आहे डिटेल्स?

ब्रोकरेज फर्म जेफरीजने सोमवारी, २० जानेवारी रोजी बाजार बंद झाल्यानंतर डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनविणारी कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज लिमिटेडला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग दिलंय. जेफरीजनं 'अंडरपरफॉर्म' रेटिंगसह याला १२,६०० रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. ही किंमत सोमवारच्या १७५५४.४५ रुपयांच्या बंद किंमतीपेक्षा २८% कमी होण्याची शक्यता दर्शवतं. 

गोल्डमन सॅक्सनं डिक्सनवर 'सेल' रेटिंग असून टार्गेट प्राइस १०,२४० रुपये आहे, जे जेफरीजच्या शेअरसाठी सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी आहे. सोमवारच्या बंद किमतीच्या तुलनेत ही ४१ टक्क्यांची घसरण आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजनं आपल्या कोअर मोबाइल व्यवसायात १९०% वाढ नोंदविली, जी आता कंपनीच्या टॉपलाइनमध्ये जवळजवळ ९०% योगदान देते. कंपनीचे इतर बहुतांश पॅरामिटर्स अपेक्षेप्रमाणे होते.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

मोबाइल पीएलआयची मुदत २०२६ मध्ये संपत असून ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक विक्रीत वार्षिक आधारावर ३२ टक्के घट झाली आहे, असं जेफरीजनं एका नोटमध्ये म्हटलंय. जेफरीजच्या मते, आर्थिक वर्ष २०२६ च्या किमती-उत्पन्नाच्या १०७ पट दरानं डिक्सनचं रिस्क रिवॉर्ड वाढलं आहे आणि यावरून त्यांची 'अंडरपरफॉर्म' दाखवून देते. दुसरीकडे, सीएलएसएचे शेअरवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग असून १८,८०० रुपयांचं टार्गेट प्राइस दिलं आहे. ब्रोकरेजनं म्हटलंय की हा मोबाइल सेगमेंट आहे जो डिक्सनच्या मध्यम कालावधीत वाढीस चालना देईल. आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ दरम्यान, सीएलएसएला डिक्सनचं उत्पन्न, व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशन (एबिटडा) आणि निव्वळ नफा अनुक्रमे ५९%, ५८% आणि ६७% चक्रवाढ वार्षिक विकास दरानं (सीएजीआर) वाढण्याची अपेक्षा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक