Join us
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 'Muhurat Trading' 2021 : पाहा वेळ, महत्त्व आणि काय आहे मुहुर्त ट्रेडिंग; यावेळी काय करण्यापासून वाचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 16:27 IST

Share Market Muhurat Trading : आजच्या दिवशी शेअर मार्केटचं कामकाज बंद असलं तरी काही वेळासाठी ते सुरू करण्यात येतं.

दिवाळीनिमित्त काही दिवसांसाठी शेअर बाजाराचं कामकाज बंद असतं. परंतु दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार काही वेळासाठी खुला होतो. या विशेष वेळेला मुहुर्त ट्रेडिंग असं म्हटलं जातं. या दरम्यान, जेव्हा शेअर मार्केट खुला होतो त्यावेळी ग्राहकांना गुंतवणूकीची संधीही मिळते. मुहुर्त ट्रेडिंगपूर्वी शेअर मार्केटमध्ये स्टॉक ब्रोकर आपल्या खात्यांची पूजा करतात. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, असं व्यावसायिकांचं मत आहे. आशियातील सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज BSE गेल्या ६० वर्षांपासून आपली मुहुर्त ट्रेडिंगची परंपरा कायम ठेवून आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर्सची खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. याच कारणास्तवक शेअर बाजार एका तासासाठी खुला होतो. यावेळी मुहुर्त ट्रेडिंगसाठी बाजार आज ६.१५ वाजल्यापासून ७.१५ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

काय करावं आणि काय करू नये?मुहुर्त ट्रेडिंग दरम्यान छोटी गुंतवणूक करून शुभ करून घ्या. याशिवाय गुंतवणूकीदरम्यान तो स्टॉक भविष्यात तुम्हाला उत्तम रिटर्न देईल याकडे लक्ष द्या. यादरम्यान, क्वालिटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करा. ज्यांची कागमिरी चांगली आहे आणि कंपनी चांगली आहे, त्यांना प्राधन्य द्या. मुहुर्त ट्रेडिंगची वेळ फार कमी असते, त्यामुळे या कालावधीदरम्यान मोठी गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. हे सामान्य सत्राप्रमाणे नसल्यानं अनेकदा गुंतवणूकदारांकडून चूकही होऊ शकते.

टॅग्स :शेअर बाजारदिवाळी 2021