DA Impact On Salary : देशातील सर्वात मोठा सण दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी दिवाळी बोनसची वाट पाहत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. महागाई भत्त्यात ३% वाढ करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर आणि पेन्शनवर होणार आहे.
नवीन DA दर ४८% झालाकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याचा दर पूर्वीच्या ४५% वरून ४८% पर्यंत वाढवण्यात आला आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आली आहे.
तुमचा पगार किती वाढेल?महागाई भत्त्यात ३% वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात होणारी वाढ खालीलप्रमाणे आहे. ही वाढ मूळ वेतनाच्या आधारावर मोजली जाते.
पद | मूळ वेतन | नवीन DA (४८%) | मासिक पगारवाढ (₹) |
शिपाई | ₹१८,००० | ₹८,६४० | ₹५४० |
लिपिक | ₹१९,९०० | ₹९,५५२ | ₹५९७ |
अपर डिव्हिजन क्लर्क | ₹२५,५०० | ₹१२,२४० | ₹७६५ |
सेक्शन ऑफिसर | ₹५६,१०० | ₹२६,९२८ | ₹१,६८३ |
डायरेक्टर | ₹१,२३,००० | ₹५९,०४० | ₹३,६९० |
जॉईंट सेक्रेटरी | ₹१,४४,२०० | ₹६९,२१६ | ₹४,३२६ |
सेक्रेटरी | ₹२,२५,००० | ₹१,०८,००० | ₹६,७५० |
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी फायदाया दिवाळीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हा 'जॅकपॉट' ठरला आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या पगाराएवढा प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्यासही मंजुरी दिली आहे.
वाचा - महिलांना मोठी संधी! 'ही' सरकारी बँक ५ वर्षांत करणार ३०% महिलांची भरती, काय आहे योजना?या निर्णयामुळे लोको पायलट, ट्रॅक मेंटेनर, स्टेशन मास्टर आणि गार्ड्ससह सुमारे ११ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.महागाई भत्त्यातील वाढ आणि ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.
Web Summary : Central government employees and pensioners receive a Diwali gift: a 3% dearness allowance (DA) hike, raising it to 48%. This increases monthly salaries based on basic pay. Railway employees also get 78-day bonus.
Web Summary : केंद्र सरकार के कर्मचारियों और पेंशनभोगियों को दिवाली का तोहफा: 3% महंगाई भत्ते (डीए) में वृद्धि, जिससे यह 48% तक पहुंच गया। इससे मूल वेतन के आधार पर मासिक वेतन में वृद्धि होगी। रेलवे कर्मचारियों को भी 78 दिन का बोनस मिलेगा।