नवी दिल्ली : Reliance Jio ने यंदाच्या आयपीएल सीझनसाठी बाजारात आणलेले Disney+ Hotstar VIP अॅडऑन पॅकच्या किंमतीत मोठा बदल केला आहे. कंपनी या विशेष टॅरिफ व्हाऊचरला 222 रुपयांमध्ये ऑफर करत होती. याद्वारे Disney+ Hotstar VIP चे वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि 15 जीबी डेटा मोफत दिला जात होता. मात्र, आता हे डेटा पॅक महागले आहे.
रिलायन्स जिओने हे डेटापॅक 33 रुपयांनी महाग केले आहे. ग्राहकांना आता या पॅकसाठी 255 रुपये मोजावे लागणार आहे. या पॅकसोबत मोफत IPL च्या मॅच पाहता येणार आहेत. OnlyTech च्या रिपोर्टनुसार MyJio अॅपमध्ये हे जुने पॅक नवीन किंमतीने दिसू लागले आहे. आत ग्राहकांना या किंमतीचे रिचार्ज करावे लागणार आहे. जियोचा हा प्रीपेड प्लॅन आहे. यामध्ये 15 जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच Disney+ Hotstar VIP पॅकही मिळते. डेटा संपल्यानंतर स्पीड 64 केबीपीएस राहतो. हा प्लॅन युजरला सध्याच्या मूळ प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत वापरता येतो.
कंपनीने सप्टेंबरमध्ये आयपीएलचा प्लॅन इतरांसाठी खुला केला. जियो प्राइम एक्सक्लूसिव टैरिफ व्हाउचर्स (STV) 2399 रुपये, 2121 रुपये, 1699 रुपये, 999 रुपये, 599 रुपये, 555 रुपये आणि 444 रुपयांवरही लागू होतो. जर ग्राहकाला Disney+ Hotstar VIP सबस्क्रीप्शन हवे असेल तर 255 रुपयांच्या या प्लॅनचे रिचार्ज मारावे लागणार आहे.
तसेच 56 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 84 जीबी डेटासह वर्षाचे Disney+ Hotstar VIP सबस्क्रीप्शन देणारा प्लॅनही जिओ अॅपवर उपलब्ध आहे. याशिवाय 612, 1004, 1206, 1208 असे जादा व्हॅलिडिटी आणि डेटासह Disney+ Hotstar VIP सबस्क्रीप्शनचे प्लॅनही उपलब्ध आहेत.