Join us

डिजिटल व्यवहार तीन वर्षात चारपट; छोट्या महानगरांमध्येही प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 04:55 IST

एटीएम, क्रेडिट कार्ड व मोबाईल वॉलेटद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल व्यवहाराच्या संख्येत गेल्या तीन वर्षात चारपट वाढ झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मुंबई - एटीएम, क्रेडिट कार्ड व मोबाईल वॉलेटद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल व्यवहाराच्या संख्येत गेल्या तीन वर्षात चारपट वाढ झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.तीन वर्षापूर्वी २०१५ साली देशभर दररोज कार्डद्वारे होणाºया डिजिटल व्यवहाराची संख्या ८० लाख होती ती २०१६ साली १.१७ कोटी झाली. २०१७ साली दररोज २.४० कोटी डिजिटल व्यवहार होत होते तर आता २०१८ साली दररोज ३.३० कोटी डिजिटल व्यवहार होतात.याचप्रमाणे २०१६ साली ई-वॉलेटद्वारे दररोज २० लाख व्यवहार होत होते तर २०१७ साली ही संख्या १ कोटी ४ लाख झाली व २०१८ साली ही संख्या ४ कोटी ८२ लाखावर पोहचली आहे.८ नोव्हेंबर २०१६ रोजी १००० व ५०० च्या नोटा बंद झाल्यानंतर डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. १० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या छोट्या महानगरांमध्येही आता कार्डद्वारे व्यवहार करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :ऑनलाइनव्यवसाय