PhonePe IPO: डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म 'फोनपे'ला (PhonePe) आयपीओ (IPO) आणण्यासाठी भारतीय बाजार नियमाक सेबीकडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. आता कंपनी लवकरच आपल्या आयपीओशी संबंधित कागदपत्रं (UDHRP) दाखल करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे नजीकच्या काळात भारतातील सर्वात बहुप्रतीक्षित फिनटेक कंपनीसाठी आयपीओ आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही फिनटेक कंपनीकडून आणला जाणारा हा देशातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ असेल. फोनपे या आयपीओद्वारे सुमारे १२,००० कोटी रुपये उभे करू शकते. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये पेटीएमने आयपीओद्वारे १८,००० कोटी रुपये उभारले होते.
फोनपेद्वारे होतात सर्वाधिक युपीआय व्यवहार
अमेरिकेतील दिग्गज कंपनी 'वॉलमार्ट'ची गुंतवणूक असलेली फिनटेक कंपनी फोनपेचा आयपीओ पूर्णपणे ओएफएस (OFS - Offer For Sale) वर आधारित असेल, यात नवीन शेअर्स नसतील. फोनपेचे प्रवर्तकच या आयपीओमध्ये आपले शेअर्स विकतील. म्हणजेच, कंपनी आयपीओच्या माध्यमातून कोणतेही अतिरिक्त प्राथमिक भांडवल उभारणार नाही. भारतात युपीआय व्यवहारांच्या बाबतीत फोनपे ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. सुमारे ४५ टक्क्यांहून अधिक बाजार हिस्स्यासह फोनपे भारताच्या डिजिटल पेमेंट मार्केटचे नेतृत्व करत आहे. एनपीसीआयच्या (NPCI) आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये कंपनीने ९.८ अब्ज व्यवहार केले. फोनपेद्वारे दरमहा सरासरी १० अब्ज व्यवहार होतात, ज्याद्वारे सुमारे १२ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण होते.
२०२४-२५ मध्ये कमावला ७११५ कोटींचा महसूल
कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७,११५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. देशांतर्गत शेअर बाजारात फोनपे लिस्ट झाल्यामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रासाठी एक महत्त्वाचं उदाहरण प्रस्थापित होईल आणि इतर फिनटेक कंपन्यांसाठीही बाजारात येण्याचा रस्ता मोकळा होईल. व्यवसायात मोठ्या प्रमाणावर विविधता असूनही, डिजिटल पेमेंटच फोनपेच्या वाढीत मुख्य भूमिका बजावत आहे आणि त्याच्या एकूण महसुलाचा ९० टक्क्यांहून अधिक वाटा डिजिटल पेमेंटमधूनच येतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : PhonePe's ₹12,000 crore IPO gets SEBI approval. The IPO will be entirely OFS-based, with promoters selling shares. PhonePe leads India's UPI market with over 45% share, processing billions of transactions monthly. The company earned ₹7,115 crore revenue in FY25.
Web Summary : PhonePe के ₹12,000 करोड़ के आईपीओ को SEBI की मंजूरी मिली। आईपीओ पूरी तरह से ओएफएस-आधारित होगा, जिसमें प्रमोटर शेयर बेचेंगे। PhonePe 45% से अधिक हिस्सेदारी के साथ भारत के UPI बाजार में अग्रणी है, जो मासिक रूप से अरबों लेनदेन संसाधित करता है। कंपनी ने वित्त वर्ष 25 में ₹7,115 करोड़ का राजस्व अर्जित किया।