Income Tax Latest News: देशभरात थकीत असलेल्या ४३ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करांपैकी ६७ टक्के रक्कम म्हणजेच तब्बल २९ लाख कोटी रुपये वसूल करणे कठीण असल्याची माहिती आयकर विभागाने संसदीय समितीला दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वित्तविषयक संसदीय स्थायी समितीने एवढ्या मोठ्या प्रमाणातील कर थकबाकीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी करमाफी, स्थगितीसह इतर पर्यायांवर विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
काही रक्कम १९९० पासून थकीत
सीबीडीटी अध्यक्षांनी स्पष्ट केले की, आमच्याकडे ४३,००,००० कोटी रुपयांची थकबाकी आहे, जी मोठ्या प्रमाणावर जुन्या प्रकरणांशी संबंधित आहे. काही रक्कम १९९० च्या दशकाच्या मध्यापासून थकीत आहे, कारण पूर्वी आम्ही मॅन्युअल नोंदी ठेवत होतो.
थकीत कर रकमेतील मोठा भाग बनावट
महसूल सचिवांनी सांगितले की, या थकीत कररकमेतील मोठा भाग बनावट असल्याचे समोर आले.१०,५५,९०६ कोटी रुपये इतका कर थकबाकीचा मोठा भाग पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहे.४३,०७,२०१ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी २८,९५,८५१ कोटी रुपये (६७%) वसूल करणे जवळपास अशक्य आहे, असे अहवालात म्हटले आहे.