Join us

अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 05:57 IST

Adani Latest News: कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध करण्यास या माध्यमातून बंदी घालण्यात आली.

नवी दिल्ली : अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडला दिलासा देताना दिल्लीतील  न्यायालयाने काही पत्रकार व परदेशांशी संबंधित संस्थांच्या कार्यकर्त्यांना कंपनीविरुद्ध विनापुरावा मानहानी होण्याची शक्यता असलेल्या बातम्या किंवा माहिती प्रसिद्ध करण्यास शनिवारी बंदी घातली. यासंबंधी प्रसिद्ध लेख किंवा सोशल मीडियावरील पोस्टमधून अशी भ्रम निर्माण करणारे साहित्य डिलीट करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध करण्यास या माध्यमातून बंदी घालण्यात आली. कंपनीच्या प्रतिष्ठेचा हवाला देऊन हे साहित्य काढून टाकणे शक्य नसेल तर आदेशानंतर पाच दिवसांच्या आत या पोस्ट व लेख डिलीट करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

अदानी लिमिटेडचे प्रकरण काय? 

काही वेबसाईटसह सोशल मीडियावर अदानी समूहाची प्रतिमा मलीन व्हावी म्हणून माहिती प्रसिद्ध केली होती. या प्रकरणात पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता, रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयस्कांत दास, आयुष जोशी यांच्यासह बॉब ब्राऊन फाऊंडेशन, ड्रीमस्केप नेटवर्क इंटरनॅशनल प्रा. लि., गेटअप लिमिटेड, डेामेन डायरेक्टर्स प्रा. लि. व जॉन डोशी संबंधित प्रतिवादी आहेत. 

तर कंपनीने युक्तिवादात केला की, खोट्या आरोपांमुळे गुंतवणूकदारांच्या विश्वासालाही तडा गेला व भारताच्या जागतिक प्रतिमेवर याचा परिणाम झाला.

टॅग्स :अदानीउच्च न्यायालय