Join us  

कोरोनाकाळातही जगातील मोठ्या संस्थेने कायम ठेवली भारताची रेटिंग, अर्थव्यवस्थेबाबत दिली खूशखबर

By बाळकृष्ण परब | Published: September 26, 2020 11:42 AM

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये प्रचंड मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी जगातील मोठी रेटिंग संस्था असलेल्या एस अँड पी ग्लोबलने भारताच्या रेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची घट केलेली नाही.

ठळक मुद्देएस अँड पी ग्लोबलने भारताची फॉरेन अँड लोकल सॉवरेन क्रेडिट रेटिंग बीबीबी (-) लाँग टर्म आणि ए-३ शॉर्ट टर्म वर कायम ठेवली भारताच्या लाँग टर्म रेटिंगबाबत आपला आऊटलूक स्टेबल कोरोना विषाणूच्या संकटामुळे २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी घट होणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे भारतासमोर आरोग्याबरोबरच मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये प्रचंड मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी जगातील मोठी रेटिंग संस्था असलेल्या एस अँड पी ग्लोबलने भारताच्या रेटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची घट केलेली नाही. एस अँड पी ग्लोबलने भारताची फॉरेन अँड लोकल सॉवरेन क्रेडिट रेटिंग बीबीबी (-) लाँग टर्म आणि ए-३ शॉर्ट टर्म वर कायम ठेवली आहे.भारताच्या रेटिंगबाबत या संस्थेने सांगितले की, भारताच्या लाँग टर्म रेटिंगबाबत आपला आऊटलूक स्टेबल आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी घट होणार आहे. मात्र या रेटिंगचा अर्थ असा आहे की, भारताकडे आपल्या वित्तीय देणवाघेवाण करण्यासाठीची योग्य क्षमता आहे. पण आर्थिक संकटामुळे भारतासमोरची धोका कायम आहे.या एजन्सीने सांगितले की, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूचा फैलावा होण्यापूर्वीच्या स्थितीच्या तुलनेत आता उत्पादनामध्ये सुमारे १३ टक्क्यांचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. भारताचा प्रमुख क्रेडिट कमकुवतपणा वाढला आहे. तसेच संथपणे होत असलेल्या आर्थिक रिकव्हरीमुळे सरकारचा रेव्हेन्यू आऊटलूकसुद्धा कमकुवत होणार आहे.एस अँड पी ग्लोबल रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताच्या रियल जीडीपीच्या वाढीमध्ये सुधारणा दिसून येणार आहे. रेटिंग एजन्सीच्या स्केलमध्ये बीबीबी (-) ही सर्वात वाईट इन्वेस्टमेंट ग्रेड रेटिंग आहे. रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की भारतीय फॉरेक्स रिझर्व्हमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीमुळे देशासाठी चांगले संकेत मिळत आहेत. त्यामुळे एक्स्टर्नल सेटिंगमध्ये सुधारणा होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्यातेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतकोरोना वायरस बातम्या