Join us
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 14:42 IST

वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे.

वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू आहे, त्यानंतर नवीन वर्ष २०२६ सुरू होईल. वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे. वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि सोबतच दंड देखील भरावा लागू शकतो. चला, या तपशीलांबद्दल जाणून घेऊया.

पॅन-आधार लिंक करण्याची डेडलाईन

३१ डिसेंबर २०२५ ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख आहे. सरकारनं आधार आणि पॅन लिंक करणं अनिवार्य केलं आहे आणि सर्व लोकांसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी ३१ डिसेंबरपूर्वीच आपलं आधार आणि पॅन लिंक करावं.

चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?

आधार-पॅन लिंक न केल्यास काय होईल?

जर एखाद्या व्यक्तीनं ३१ डिसेंबरपूर्वी आपलं आधार-पॅन लिंक केलं नाही, तर त्याला मोठी अडचण होऊ शकते. त्या व्यक्तीची अनेक आर्थिक आणि बँक संबंधित कामं अडकू शकतात. यामुळे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं, ज्यामुळे पुढे अनेक समस्या निर्माण होतील. तसेच, यामुळे आयटीआर (ITR) फाइल करतानाही अडचण येईल आणि तुमचा आयटीआर रिफंड देखील थांबू शकतो.

बिलेटेड ITR फाइल करण्याची अंतिम मुदत

बिलेटेड आयटीआर (Belated ITR) फाइल करण्याची अंतिम तारीख देखील ३१ डिसेंबर २०२५ आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचा बिलेटेड आयटीआर फाइल केला नसेल, तर हे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करा.

३१ डिसेंबरपर्यंत फाइल न केल्यास काय होईल?

जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी तुमचा बिलेटेड आयटीआर फाइल केला नाही, तर तुम्हाला तुमचा रिफंड मिळणार नाही. तसंच, तुम्हाला लेट फी सोबतच व्याज देखील भरावं लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Act fast! Deadline December 31: Complete these tasks to avoid penalties.

Web Summary : Complete PAN-Aadhaar linking and file belated ITR by December 31st to avoid penalties and financial disruptions. Failure to comply may lead to inactive PAN, ITR refund delays, and late fees. Don't delay!
टॅग्स :पैसासरकारइन्कम टॅक्स