Join us

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 13:29 IST

7th Pay Commission DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३% महागाई भत्ता वाढण्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल.

7th Pay Commission DA Hike: आता जीएसटी दरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक 'गुड न्यूज' देण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकार दिवाळीपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते.

या निर्णयामुळे देशातील १.२ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल. दसरा आणि दिवाळीपूर्वी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याचा फायदा त्यांना पूर्णपणे मिळण्याची शक्यता आहे.

३ महिन्यांची थकबाकीही मिळणारकेंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ३ टक्के वाढून ५८ टक्के होण्याची शक्यता आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू मानली जाईल. त्यामुळे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबरच्या पगारात किंवा पेन्शनमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी (एरियर) देखील मिळून येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ३ टक्के डीए वाढीची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते.

सरकार वर्षातून दोनदा (१ जानेवारी आणि १ जुलै) महागाईच्या वाढत्या प्रभावापासून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी महागाई भत्त्यात सुधारणा करते. या वाढीची घोषणा साधारणपणे फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते.

वाचा - ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?

महागाई भत्ता कसा मोजला जातो?औद्योगिक कामगारांसाठी महागाई भत्त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आधारावर केली जाते. हा निर्देशांक कामगार ब्युरो दर महिन्याला जारी करते. सरकार मागील १२ महिन्यांच्या CPI-IW च्या आकड्यांची सरासरी काढून आणि सातव्या वेतन आयोगाखालील एका विशिष्ट फॉर्म्युल्याचा वापर करून महागाई भत्त्यात वाढीची गणना करते. उदाहरणार्थ, जुलै २०२४ ते जुलै २०२५ पर्यंत CPI-IW ची सरासरी १४६.३ राहिली आहे. यानुसार, सध्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ३ टक्के वाढून ५८ टक्के होणार आहे.

टॅग्स :सरकारकर्मचारीशासन निर्णय