IPL Ecosystem: २०२५ मध्ये आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने विजेतेपद जिंकले. यामुळे देशभरातील विराट कोहलीच्या चाहत्यांनीही आनंद साजरा केला. पण, तरी या क्रिकेट लीगच्या व्यावसायिक मूल्यासाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. एका वर्षात आयपीएलच्या संपूर्ण इकोसिस्टमच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ६,६०० कोटी रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
ब्रँड फायनान्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू मागील वर्षीच्या १२ अब्ज डॉलरवरून थेट २०% ने कमी होऊन ९.६ अब्ज डॉलर झाली आहे. भू-राजकीय तणाव आणि मेगा-लिलावामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ही मोठी घसरण झाली आहे.
लीगच्या मूल्यांकनात मोठी घसरणडी अँड पी ॲडव्हायझरीच्या अहवालानुसार, लीगच्या व्हॅल्यूएशनमध्ये सलग दोन वर्षांची घट झाली आहे. २०२३ मध्ये आयपीएलची व्हॅल्यू ९२,५०० कोटी रुपये होती, जी २०२४ मध्ये ८२,७०० कोटी रुपये झाली, तर २०२५ मध्ये ती आणखी कमी होऊन ७६,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मीडिया कंपन्यांचे एकत्रीकरण आणि रिअल मनी गेमिंग प्रायोजकांवर सरकारी निर्बंध आल्यामुळे आयपीएलच्या जलद वाढीला ब्रेक लागल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
फ्रँचायझींनाही मोठे नुकसान
- आयपीएल जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसह अनेक मोठ्या फ्रँचायझींच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
- मुंबई इंडियन्स १०८ दशलक्ष डॉलर मूल्यांसह सर्वात मौल्यवान फ्रँचायझी राहिली, पण त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ९% घट झाली आहे.
- आरसीबीने पहिले विजेतेपद मिळवले असले तरी, त्यांच्या व्हॅल्यूमध्ये १०% ची घट होऊन ती १०५ दशलक्ष डॉलर झाली.
- चेन्नई सुपर किंग्सला २४% ची मोठी घसरण पाहावी लागली आणि त्यांचे मूल्य ९३ दशलक्ष डॉलर झाले.
- कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ३३% ची मोठी घट नोंदवण्यात आली.
- राजस्थान रॉयल्सला ३५% सह सर्वाधिक घसरण झाली, तर सनरायझर्स हैदराबाद ३४% ने घसरली.
वाचा - UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम
फक्त गुजरात टायटन्सची व्हॅल्यू वाढली
घटलेल्या बाजारात केवळ गुजरात टायटन्स ही एकमेव फ्रँचायझी आहे, जिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ नोंदवली गेली. त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये २% ची वाढ होऊन ती ७० दशलक्ष डॉलर झाली आहे. इतर फ्रँचायझी, पंजाब किंग्स (३%), लखनऊ सुपर जायंट्स (२%), आणि दिल्ली कॅपिटल्स (२६%) यांनाही नुकसान सोसावे लागले.
Web Summary : Despite RCB's historic IPL win, the league's brand value fell by $2.4 billion. Geopolitical tensions and mega-auctions caused uncertainty. Most franchises, except Gujarat Titans, saw brand value decline. Mumbai Indians remain most valuable.
Web Summary : RCB की ऐतिहासिक IPL जीत के बावजूद, लीग का ब्रांड मूल्य 2.4 बिलियन डॉलर गिर गया। भू-राजनीतिक तनाव और मेगा-नीलामी के कारण अनिश्चितता हुई। गुजरात टाइटन्स को छोड़कर अधिकांश फ्रेंचाइजी के ब्रांड मूल्य में गिरावट आई। मुंबई इंडियंस सबसे मूल्यवान बनी हुई है।