Crude oil price on 06 April 2026: ६ एप्रिल म्हणजेच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळत आहे. क्रूड ऑईलचा दर आता ११२ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला असून, आज सकाळी तो ११५ डॉलरपर्यंत पोहोचला होता. ब्रेंट क्रूडची किंमतही ११० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या नवीन धमकीनंतर ही दरवाढ झाली. ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा नवीन इशारा
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इशाऱ्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे.
- इराणला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' खुला करण्यासाठी दिलेली मुदत ६ एप्रिल रोजी संपत होती, परंतु ती आता २४ तासांसाठी वाढवण्यात आली आहे.
- आता इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असून, यापुढे कोणतीही नवीन सवलत किंवा प्रस्ताव दिला जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
- इराणनं मागण्या मान्य न केल्यास त्यांच्या वीज प्रकल्पांना आणि पायाभूत सुविधांना थेट लक्ष्य केलं जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
- इराणनंही प्रत्युत्तर दिलं असून, जर त्यांच्या सुविधांवर हल्ला झाला तर ते देखील जशास तसं उत्तर देण्यास तयार आहेत.
- २८ फेब्रुवारीपासून मध्य पूर्वेतील हा तणाव सुरू असून, यामुळे कच्च्या तेलाच्या किमती जवळजवळ दुप्पट झाल्यात.
वाढत्या किमतीचे परिणाम
- HSBC च्या अहवालानुसार, जर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ $१०० च्या वर राहिल्या, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अहवालात असंही म्हटलंय की, ही स्थिती कायम राहिल्यास महागाईचा दर ६ टक्क्यांच्या वर जाऊ शकतो.
- महागाई ६ टक्क्यांच्या वर गेल्यास खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून रोजच्या वापरातील वस्तू, वीज आणि वाहतूक सर्वच महाग होईल.
- शेती, वाहतूक, कारखाने आणि वीज निर्मितीसाठी पेट्रोल-डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे या सर्व क्षेत्रांवर परिणाम होईल.
भारतासमोरील आर्थिक आव्हानं
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतावर आर्थिक दबाव वाढवत आहेत, कारण आयातीसाठी देशाला जास्त पैसे मोजावे लागतील. मध्य पूर्वेतील तणाव जितका लांबेल तितकी महागाई वाढण्याची भीती आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी हा संघर्ष लवकरात लवकर थांबवावा, अशी अनेक देशांची इच्छा आहे.
Web Summary : Crude oil prices soared, exceeding $115 per barrel, fueled by Trump's threats to Iran. Rising costs threaten global inflation, potentially impacting daily expenses, transportation, and electricity. India faces increased economic pressure due to its heavy reliance on oil imports.
Web Summary : ट्रंप की ईरान को धमकी के बाद कच्चे तेल की कीमतें 115 डॉलर प्रति बैरल से ऊपर पहुंच गईं। बढ़ती लागत से वैश्विक मुद्रास्फीति का खतरा है, जिससे दैनिक खर्च, परिवहन और बिजली प्रभावित हो सकती है। तेल आयात पर भारी निर्भरता के कारण भारत पर आर्थिक दबाव बढ़ रहा है।