Crude Oil: अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले असून, कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर सुमारे ६० टक्क्यांनी वाढले आहेत. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा कच्च्या तेलाची किंमत सुमारे ७० डॉलर प्रति बॅरल होती. मात्र २३ मार्चपर्यंत ती वाढून ११४.७५ डॉलर प्रति बॅरल या धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीमुळे जगाचा श्वास रोखला
गेल्या ३० दिवसांत कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. या संकटाच्या केंद्रस्थानी स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. हा समुद्री मार्ग जागतिक कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि तणावामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मालवाहू जहाजांच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुरवठा कमी झाल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत.
कतार ते इराक, तेल उत्पादनावर मोठा परिणाम
पुरवठा संकट फक्त वाहतूक मार्गांपुरते मर्यादित नाही, तर तेल उत्पादक देशांमध्येही परिस्थिती गंभीर बनली आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे कतारच्या ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे कतारच्या LNG निर्यात क्षमतेत सुमारे १७% घट झाली. इराकनेही परदेशी कंपन्यांच्या तेल क्षेत्रांमध्ये ‘फोर्स मेज्योर’ (आपत्कालीन स्थिती) जाहीर केली आहे. इराकमधील बसरा ऑइल कंपनीचे उत्पादन युद्धापूर्वी ३३ लाख बॅरल प्रतिदिन होते, जे आता ९ लाख बॅरल प्रतिदिनवर आले आहे.
कच्चे तेल १३५ डॉलरपर्यंत जाण्याची भीती
या जागतिक संकटाचा परिणाम भारतीय बाजारातही दिसू लागला आहे. अमेरिकन WTI तेल १०१.४३ डॉलर प्रति बॅरल, तर MCX वर कच्चे तेल ₹९,६०१ प्रति बॅरलवर पोहोचले आहे. जागतिक वित्तीय संस्था गोल्डमन सॅक्स ने २०२६ साठी ब्रेंट क्रूडचा सरासरी दर ७७ डॉलरवरून ८५ डॉलर प्रति बॅरल केला आहे. तर, मार्च आणि एप्रिलसाठी सरासरी दर ११० डॉलर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Web Summary : Global tensions fuel energy crisis. Crude oil prices surged 60% in a month, nearing $115. Hormuz Strait disruption and production cuts in Qatar and Iraq threaten supply, potentially pushing prices to $135. Indian markets feel the impact.
Web Summary : वैश्विक तनाव से ऊर्जा संकट गहराया। कच्चे तेल की कीमतें एक महीने में 60% बढ़ीं, $115 के करीब। होर्मुज जलडमरूमध्य में व्यवधान और कतर, इराक में उत्पादन कटौती से आपूर्ति खतरे में, कीमतें $135 तक जा सकती हैं। भारतीय बाजार प्रभावित।