Join us  

पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:17 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 

प्रत्येक नोकरदारासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) हा त्याच्या हक्काचा आणि कष्टाचा पैसा असतो. अडीअडचणीच्या काळात त्याला याच पैशांचा आधार असतो. या हक्काच्या पैशावर कोणतेही गंडांतर येऊ नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 

- खातेधारकांनी कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध रहावे- ईपीएफओ खातेधारकांना कधीही यूएएन, आधार - क्रमांक वा तत्सम कोणताही तपशील विचारत नाही- अशी विचारणा करणारा कॉल आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे.

हेही लक्षात ठेवा- ईपीएफओच्या बनावट संकेतस्थळापासून सावध रहा. - या दक्षतेच्या इशाऱ्याकडे खातेधारकांनी दुर्लक्ष करू नये. - खातेधारकांनी सूचनेकडे लक्ष न दिल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. 

बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार डिजिटल व्यवहारांमुळे २०१८-१९ या वर्षात ७१,५४३ - कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली. - २०१७-१८ या आर्थिक वर्षात हे प्रमाण ५९१६ प्रकरणे एवढे होते.- २०१८-१९ या कालावधीत बँक फसवणुकीची ६८०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. - या आर्थिक वर्षात ४१,१६७ कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली. - गेल्या ११ वर्षांमध्ये बँक फसवणुकीची एकूण ५३,३३४ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. - बँकिंग फसवणुकीचा आर्थिक आकडा तब्बल २.०५ लाख कोटी रुपये एवढा आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीपैसा