Join us  

Coronavirus : शेअर बाजाराला कोरोनाचा फटका, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:24 PM

Coronavirus: भारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे.

ठळक मुद्देभारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे.आज दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले

मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका भारतासह जगभरातील शेअर बाजाराला बसला आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच घसरण पाहायला मिळाली. आज दुपारनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली.

दुपारी 2.40 वाजता सेन्सेक्समध्ये 3100 अंकांची घट होऊन 32,600 वर बंद झाला. तर निफ्टीत 950 अंकांनी घसरण झाली असून 9,500 अंकांवर स्थिरावला आहे. शेअर बाजारातील ही ऐतिहासिक घसरण असल्याचे म्हटले जात असून यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दिवसाच्या सुरुवातीला 1600 अंकांएवढी मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स 34000 अंकावर पोहोचला होता. निफ्टीतही 500 अंकांची घसरण होऊन तो 10 हजारांच्या खाली पोहोचला होता.

भारतीय शेअर बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिका शेअर बाजारात निर्देशांक 1400 अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेसह प्रमुख देशांच्या शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. Dow jones मध्ये 1464.94 अंकांची अर्थात 5.86 टक्के घसरण झाली असून 23,553 वर स्थिरावला आहे. तर एस अँड पीमध्ये 140.85 अंकांची अर्थात 4.89 टक्क्यांची घसरण झाली असून 2741 अंकांवर स्थिरावला. Nasdaq ur 392 अंक घसरला असून 7952 वर स्थिरावला आहे.

आणखी बातम्या...

'कोरोना गो'... नंतर आठवलेंचा नवा नारा, महाविकास आघाडी गो...

Coronavirus: ही १० कारणं वाचा; मग कमी होईल तुमचीही चिंता

लोकसभा नाकारणाऱ्या राजीव सातव यांना काँग्रेसकडून 'राज्यसभेची लॉटरी'

भाजपाकडून 'मराठेशाही'चा विस्तार; राज्यसभेवर दोन छत्रपतींसोबत एक 'सरदार'

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांककोरोनानिफ्टी