Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रिलायन्सकडून सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:43 IST

या इश्यूद्वारे कंपनी ५३,१२५ कोटी रुपये उभारणार आहे. कोणत्याही कंपनीने काढलेल्या राइट्स इश्यूपेक्षा हा इश्यू मोठा आहे.

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राइट्स इश्यूची घोषणा केली असून, याद्वारे ५३ हजार कोटी रुपये उभारले जाणार आहेत. संचालक मंडळाने या इश्यूला मान्यता दिली आहे. समभागधारकांना १४ टक्केडिस्काउण्ट किमतीने १० रुपयांचे हे समभाग कंपनी देणार आहे. यासाठी १२५७ रुपये आकारले जाणार आहेत. कंपनी जाहीर करणाऱ्या रेकॉर्ड डेटला समभागधारक असणारे या इश्यूसाठी पात्र असतील. १५ समभागांना १ या प्रमाणात त्यांना राइट्स शेअर दिले जाणार आहेत. कंपनीचे प्रमोटर्स आणि प्रमोटर कंपनीने सर्व हक्कभाग घेण्याची घोषणा केली असून, न घेतलेल्या हक्कभागांची खरेदीही प्रमोटर्स करणार आहेत. या इश्यूद्वारे कंपनी ५३,१२५ कोटी रुपये उभारणार आहे. कोणत्याही कंपनीने काढलेल्या राइट्स इश्यूपेक्षा हा इश्यू मोठा आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सकोरोना वायरस बातम्या