Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर ग्राहकांकडून मागणीमध्ये वाढ होण्याचे संकेत, ऑनलाइन शॉपिंगमध्ये होऊ शकेल वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 04:11 IST

देशामधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये अल्पउत्पन्न गट तसेच मध्यम वर्गाकडून असलेल्या मागणीमध्ये मोठी घट झालेली दिसून आली.

मुंबई : देशातील लॉकडाऊन अद्याप पूर्णपणे रद्द झालेला नसला तरी ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील ठिकाणांचे निर्बंध कमी होत असल्याने आगामी काळामध्ये ग्राहकांच्या मागणीमध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहक प्रथमच आॅनलाइन शॉपिंगचा अनुभव घेताना दिसून आले. त्यांना हा अनुभव चांगला वाटत असल्याने आॅनलाइन शॉपिंगमध्येही वाढ होऊ शकेल.देशामधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये अल्पउत्पन्न गट तसेच मध्यम वर्गाकडून असलेल्या मागणीमध्ये मोठी घट झालेली दिसून आली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरपासून देशातील ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील ठिकाणांना काही सवलती मिळाल्या. तेथे व्यवसाय सुरू झाले. दुकानेही उघडली. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडता आॅनलाइन शॉपिंगला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी प्रथमच आॅनलाइन शॉपिंगचा लाभ घेतला असून, त्याचा सुखद अनुभव आल्याचे या ग्राहकांनी सांगितले.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी १४ टक्के व्यक्तींनी आॅनलाइन शॉपिंगमध्ये नवीन प्रकारच्या वस्तूंची खरेदी केल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे घरासाठी लागणाऱ्या वस्तू तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंची आॅनलाइन खरेदी करणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे.महाराष्टÑामधील अनेक शहरांमध्ये तसेच काही नवीन शहरांमध्ये आॅनलाइन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळून येत आहे. नवीन ग्राहक तसेच ग्राहकांच्या नवनवीन मागण्यांनुसार आपल्याकडील वस्तूंमध्ये बदल करºयाचा प्रयत्न ई-शॉपिंग व्यावसायिकांकडून केला जात असल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणामधील निष्कर्षांनुसार काही व्यावसायिकांनी बदल करण्यास प्रारंभही केला आहे.एका खासगी सर्वेक्षणानुसार आता मुख्यत: अन्नपदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि काही प्रमाणात सौंदर्यप्रसाधने आणि दैनंदिन स्वच्छतेसाठी लागणाºया वस्तूंची मागणी वाढत आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी सुमारे आठ टक्के व्यक्तींनी प्रथमच आॅनलाइन शॉपिंगचा अनुभव घेतला असून, तो सुखद असल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे या पुढील काळामध्ये आॅनलाइन शॉपिंग करणाºयांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याव्यवसायऑनलाइनबाजार