Join us

CoronaVirus : jio-Facebook कराराचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक; म्हणाले, ब्राव्हो मुकेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:36 IST

फेसबुकनं रिलायन्स जिओमधील 9.9 टक्के भागीदारी घेण्याच्या केलेल्या करारावर आनंद महिंद्रांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. 

ठळक मुद्देसर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असलेल्या फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.फेसबुकनं जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून, या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचं मूल्य 4.62 लाख कोटी रुपये झालं आहे. विशेष म्हणजे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी या कराराचं कौतुक केलं आहे.

नवी दिल्लीः सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असलेल्या फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जिओला याचा मोठा फायदा झाला आहे. फेसबुकनं जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून, या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचं मूल्य 4.62 लाख कोटी रुपये झालं आहे. विशेष म्हणजे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी या कराराचं कौतुक केलं आहे. फेसबुकनं रिलायन्स जिओमधील 9.9 टक्के भागीदारी घेण्याच्या केलेल्या करारावर आनंद महिंद्रांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. ते म्हणाले, "हा करार दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही चांगला आहे". Jioचा फेसबुकमध्ये झालेला करार हा फक्त त्या दोघांसाठीच चांगला आहे, असं नव्हे, तर कोरोना संकटाच्या काळात असा करार होणे हे भारताच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करणारा संकेत आहे. एक नवीन विकास केंद्र म्हणून जग आता भारताकडे पाहणार आहे. जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट असलेली फेसबुक रिलायन्स जिओमधील हिस्सेदारी खरेदी करणार आहे. यासाठी फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्मवर 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून जिओमध्ये फेसबुकला 9.99 टक्के भागीदारी मिळणार आहे. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर जिओचे एंटरप्राइज मूल्य वाढून 4.62 लाख कोटींवर गेले आहे. जिओची सुरुवात मे 2016मध्ये झाली होती. त्यानंतर दूरसंचार उद्योगात स्वस्त डेटा आणि फ्री कॉलिंगची एक प्रकारची स्पर्धाच सुरू झाली. या स्पर्धेतून जिओने हळूहळू टेलिकॉम इंडस्ट्रीत पाऊल मजबूत केले. आज जिओचे जवळपास 38 कोटी ग्राहक असून, त्याचा ग्राहक आधार सर्वात मोठा आहे. फेसबुकबद्दल बोलायचे झाल्यास भारतात त्याचे 40 कोटी युजर्स आहेत आणि इंटरनेट वापरणा-यांची संख्या 85 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहिंद्राफेसबुकजिओ