Join us

Corona Virus: बाजाराला बसताहेत अजूनही मोठमोठे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:51 IST

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक पुढे होणार आहे. त्याच्या आधीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त करताच फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये अर्धा टक्का कपात केली आहे

प्रसाद गो. जोशीकोरोना व्हायरसची वाढती भीती आणि त्याच्या जोडीलाच उद्योगांमध्ये मंदी येण्याची भीती यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अमेरिकेसह जगातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतालाही बसला.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभही निराशेनेच झाला. सप्ताहामधील एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता बाजार सातत्याने खालीच जाताना दिसून आला. बाजारातील विक्रीच्या प्रचंड दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला अनुग्रमे ३८ हजार आणि ११ हजार अंशांची पातळी राखता आली नाही.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झालेली दिसून आली. या घसरणीमुळे अनेक समभाग खूप खाली आले. स्मॉलकॅपच्या १५९ समभागांचे दर १० ते ७० टक्क्यांच्या दरम्यान घसरलेले दिसून आले. त्यामानाने मिडकॅपला घसरणीचा बसलेला फटका कमी होता.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक पुढे होणार आहे. त्याच्या आधीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत चिंता व्यक्त करताच फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये अर्धा टक्का कपात केली आहे. नियोजित वेळेपूर्वीच केलेल्या या कपातीमुळे जगभरामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचा संदेश गेला आणि गुरुवारपासून अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू झाली. ही घसरण तात्कालिक असू शकेल. मात्र गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे अतिशय गरजेचे आहे.

टॅग्स :शेअर बाजार