Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोना विषाणूचा साखर उद्योगाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 05:41 IST

कोरोनाचा जागतिक बाजारावर परिणाम होवून दर घसरले असले तरी स्थानिक बाजारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर: जागतिक महामारी जाहीर झालेल्या कोरोनाचा फटका साखर उद्योगालाही बसला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर प्रती पौंड १५ सेंटवरुन १२ ते १२.५ सेंटपर्यत खाली आले आहेत. कोरोनामुळे निर्यातीसाठी जहाजांची उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याने तुर्तास निर्यातच ठप्प होण्याची भीती साखर कारखानदारांना वाटत आहे.

जगभरातील साखरेचे उत्पादन यंदा तुलनेने घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर प्रति किलो १५ सेंटपर्यंत वधारले होते. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांक होता. भारतात अतिरिक्त साखर शिल्लक असल्याने निर्यातीला मोठी संधी आहे. केंद्र सरकारनेही ६० लाख टन निर्यातीचे लक्ष्य देतांना निर्यात सवलतीही देऊ केल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ३८ लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. तर सुमारे २३ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. चांगला दर मिळत असल्याने साखर कारखानदारातही उत्साह होता. या हंगामात लक्ष्याच्या जवळपास म्हणजेच ५० ते ५५ लाख टन साखरेची निर्यात होईल असा अंदाज होता.स्थानिक बाजारावर परिणाम नाहीकोरोनाचा जागतिक बाजारावर परिणाम होवून दर घसरले असले तरी स्थानिक बाजारावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. साखरेचे देशांतर्गत दर स्थीर आहेत तसेच वाहतूकही सुरळीत चालूआहे. त्यामुळे निर्यातीलाच फटका बसून देशतील अतिरिक्त साखरेचा प्रश्न पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे.ही साथ कमी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजार सुधारणार नाही. निर्यातीसाठी जहाजेही मिळणार नाहीत. यंदा ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण आहे. -प्रकाश नाईकनवरे, वयवस्थापकीय संचालक, साखर कारखाना महासंघ

टॅग्स :साखर कारखानेकोरोना