Join us  

मेट्रो प्रकल्पातील भागीदारी रिलायन्स विकण्याच्या विचारात: कंपनीनं लिहिलं सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 3:02 AM

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले पाच महिने या कंपनीचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. त्या आधीपासून कंपनी तोट्यात असल्याने कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते.

मुंबई : रिलायन्स इन्फास्ट्रक्चरची (आरइन्फ्रा) मालकी असलेली मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ही कंपनी मेट्रो प्रकल्पात असलेली आपली भागीदारी विकण्याच्या विचारात आहे. कंपनीने तसे पत्रच सरकारला लिहिले आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले पाच महिने या कंपनीचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. त्या आधीपासून कंपनी तोट्यात असल्याने कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते. ११.५ किमी लांबीच्या मेट्रो-१ प्रकल्पासाठी एमएमओपीएल हा विशेष उपक्र म (एसपीव्ही) स्थापन करण्यात आला होता. यात रिलायन्स इन्फ्राचे ६९ टक्के, २६ टक्के शेअर्स मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ५ टक्के ट्रान्सडेव्ह या कंपनीचे आहेत.अद्याप निर्णय घेतलेला नाहीनगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांनी माहिती याबाबत माहिती दिली की, आम्हाला एमएमओपीएलकडून अशा प्रकारचे पत्र मिळाले आहे परंतु त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्य सरकार आता यावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे मत जाणून घेणार आहे. मुंबईत उभारण्यात येणाया एकूण ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रोलाईन प्रकल्पासाठी एमएमआरडीए नोडल पायाभूत प्राधिकरण म्हणून काम पहात आहे.

टॅग्स :मेट्रोरिलायन्स