Join us

जिओला टक्कर, 4 महिने मोफत इंटरनेट देणार 'ही' कंपनी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:02 IST

आता वोडाफोनकडून जिओला टक्कर देण्यात येत आहे. कारण, वोडाफोनने

नवी दिल्ली - रिलायन्सच्या जिओ गिगा फायबरने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सुविधा मोफत देण्याचा प्लॅन घोषित केल्यानंतर आता वोडाफोनकडून जिओला टक्कर देण्यात येत आहे. कारण, वोडाफोनने ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. कंपनीने आपल्या YOU ब्रॉडबॅण्ड सेवेतील युजर्संना 4 महिन्यांपर्यंत इंटरनेट मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केली. जे युजर्सं त्यांच्या ब्रॉडबॅण्ड प्लॅनसाठी 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतील, त्यांना 4 महिने इंटरनेट मोफत मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या नवीन नियमानुसार 12 महिन्यांचा प्लॅन खरेदी केल्यानंतर पुढील 4 महिने मोफत सेवा मिळणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना 12 महिन्यांच्या रकमेत 16 महिने ब्रॉडबॅण्ड सुविधा मिळेल. विशेष म्हणजे ग्राहकांना जर 6 महिन्यांचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल, तर त्यांना 2 महिन्यांची इंटरनेट सुविधा मोफत मिळणार आहे. जर, 9 महिन्यांची वैधता घेणार असल्यास 3 महिने इंटरनेट सेवा मोफत मिळेल. त्यामुळे ग्राहकांना पैशाचा अधिक ताणही जाणवणार नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वोडाफोनच्या साईटवर जाऊन रिचार्ज करावा लागणार आहे. तर या रिचार्जवेळी UPGRADE33 हा कोडही वापरावा लागणार आहे.

टॅग्स :जिओव्होडाफोनइंटरनेट