Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचा खर्च वाढणार; विमान प्रवास महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:49 IST

भारतातील विमान कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. विमान खरेदी तसेच माेठ्या कर्मचारी भरतीचा परिणाम हाेईल.

नवी दिल्ली  : भारतातील प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांसमाेर येणारा काही काळ संकटाचा राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षात देशी विमान कंपन्यांना १.६ ते १.८ अब्ज डाॅलर्स एवढा ताेटा हाेण्याची शक्यता आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘कापा’ने (सीएपीए) हा अंदाज वर्तविला आहे. भारतातील विमान कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. विमान खरेदी तसेच माेठ्या कर्मचारी भरतीचा परिणाम हाेईल. कंपन्या यंदा १३२ नवी विमाने ताफ्यात जाेडणार आहेत. त्यामुळे एकूण विमानांची संख्या ८१६ एवढी हाेईल. हा आकडा पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये २ हजारांपर्यंत वाढणार आहे. खर्च वाढल्यामुळे कंपन्यांकडून प्रवासभाड्यात वाढ केली जाऊ शकते. 

टॅग्स :विमान