LPG Price : देशातील तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना संमिश्र दिलासा देत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २८ ते ३१ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवे दर आजपासून लागू झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, घरातील स्वयंपाकाच्या (१४.२ किलो) गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
घरगुती गॅसचे दर 'जैसे थे'होळीच्या तोंडावर गृहिणींचे बजेट बिघडू नये म्हणून घरगुती गॅस सिलेंडर आणि पाईप्ड गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दिल्लीत घरगुती सिलेंडरचा भाव ८५३ रुपये, तर मुंबईत ८५२.५० रुपये इतकाच राहणार आहे.
हॉटेल आणि ढाबा चालकांचे बजेट कोलमडलेहोळीच्या सणाला अवघे दोन दिवस उरले असताना कमर्शियल गॅस महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा संचालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कच्च्या मालाच्या किमतीसोबतच आता इंधन खर्च वाढल्याने बाहेरचे जेवण महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख शहरांमधील कमर्शियल सिलेंडरचे (१९ किलो) नवे दर
| शहर | जुना दर (₹) | नवीन दर (₹) | वाढ (₹) |
| दिल्ली | १,७४०.५० | १,७६८.५० | २८.०० |
| मुंबई | १,६९२.०० | १,७२०.५० | २८.५० |
| कोलकाता | १,८४४.५० | १,८७५.५० | ३१.०० |
| चेन्नई | १,८९९.५० | १,९२९.०० | २९.५० |
वाचा - अफगाण-पाक युद्धामुळे भारतीय गुंतवणुकीला धोका! २७ हजार कोटींच्या प्रकल्पांवर टांगती तलवार
Web Summary : Commercial LPG cylinder prices increased by ₹31 ahead of Holi, impacting hotels and restaurants. However, home cooking gas prices remain unchanged, offering relief to households. New rates are effective immediately.
Web Summary : होली से पहले व्यावसायिक एलपीजी सिलेंडर की कीमतों में ₹31 की वृद्धि, होटल और रेस्तरां प्रभावित। घरेलू गैस की कीमतें स्थिर, परिवारों को राहत। नई दरें तत्काल प्रभाव से लागू।