Join us

दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कनिष्ठ आणि मध्यम वर्गाच्या उत्पन्नात सुधारणा होत असून जून २०२५ च्या तिमाहीत वार्षिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कनिष्ठ आणि मध्यम वर्गाच्या उत्पन्नात सुधारणा होत असून जून २०२५ च्या तिमाहीत वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांच्या कमाईत तेजीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे ५ ते १० लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांच्या कमाईतही वाढ दिसून आली आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. १ लाख ते ५ लाख रुपये कमावणाऱ्या लोकांचा ग्राहक धारणा निर्देशांक जूनच्या तिमाहीत ५.३ टक्के वाढला. ५ ते १० लाख रुपये कमावणाऱ्यांचा निर्देशांक ०.३% वाढला. 

वित्तीय स्थितीबाबत चांगले वाटणाऱ्यांचे प्रमाण वाढलेआपल्या आर्थिक बाबतीत अधिक चांगले वाटणाऱ्या लोकांचे प्रमाण जून २०२५ च्या तिमाहीत आदल्या वर्षाच्या तुलनेत ३७.६ टक्के वाढले आहे.

कमाई किती वाढली?

५.३%१ लाख रुपयांपर्यंत२.३%२ लाख रुपयांपर्यंत१.५%२-५ लाख रुपयांपर्यंत ०.३%५-१० लाख रुपयांपर्यंत

टॅग्स :पैसा