Join us
Daily Top 2Weekly Top 5

Closing Bell Today: सेन्सेक्स ४७५ अंकांच्या उसळीसह बंद, निफ्टी २० हजारांच्या जवळ; ITC ३ टक्क्यांनी वधारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:13 IST

बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींनी आज नवा विक्रमी उच्चांक गाठला.

देशांतर्गत शेअर बाजार आज मोठ्या उसळीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींनी आज नवा विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 474.46 अंकांच्या म्हणजेच 0.71 टक्क्यांच्या वाढीसह 67,571.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 146.00 अंकांच्या म्हणजेच 0.74 टक्क्यांच्या वाढीसह 19,979.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवर आयटीसीचा शेअर सर्वाधिक 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 491.5 रुपयांवर बंद झाला.

एफएमसीजी, बँक आणि फार्मा निर्देशांक प्रत्येकी एका टक्क्याच्या उसळीसह बंद झाले. त्याचप्रमाणे आईल आणि गॅस निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात 0.8 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याचप्रमाणे पॉवर निर्देशांकामध्ये 0.4 टक्क्यांची घट झाली.

या शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्सवर आज आयटीसी, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स दोन टक्क्यांहून अधिक वाढले. याशिवाय मारुती, भारती एअरटेल, एसबीआय, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये एका टक्क्याहून अधिक वाढ दिसून आली. 

याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा स्टील, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया आणि टाटा मोटर्सचे शेअर वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
इन्फोसिसचा शेअर आज सर्वाधिक घसरणीसह बंद झाला. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, बजाज फिनसर्व्ह आणि टीसीएसचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

रुपया मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत होऊन 81.99 वर बंद झाला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 82.09 वर बंद झाला होता.

टॅग्स :शेअर बाजार