Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन यांच्यातील जवळीक वाढली; निर्यातीत जोरदार वाढ, 'या' भारतीय वस्तूंना मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:33 IST

India China Export News: पाहा कोणत्या भारतीय वस्तूंची चीनमध्ये मागणी वाढली. भारताच्या निर्यातीत यावेळी जोरदार वाढ झाल्याचं दिसून येत आहे

India China Export News: डिसेंबर २०२५ मध्ये भारताच्याचीनला होणाऱ्या निर्यातीत ६७.३५ टक्क्यांची नेत्रदीपक वाढ नोंदवण्यात आली असून, एकूण निर्यात मूल्य २.०४ अब्ज डॉलरवर पोहोचलंय. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ही वाढ प्रामुख्यानं इलेक्ट्रॉनिक्स, सागरी उत्पादनं आणि इतर प्रमुख वस्तूंच्या निर्यातीतील मजबुतीमुळे झाली आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना ही एक स्वागतार्ह वाढ असल्याचं म्हटलंय.

निर्यात वाढवणारी प्रमुख उत्पादनं

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र: पॉप्युलेटेड प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCB), फ्लॅट पॅनेल डिस्प्ले मॉड्यूल, टेलिफोनीशी संबंधित विद्युत उपकरणं आणि इतर टेलिकॉम उपकरणं.कृषी आणि सागरी उत्पादने: सुकी मिरची, ब्लॅक टायगर कोळंबी, वन्नामेई कोळंबी, मूग आणि ऑईल मील्स/ऑईल-केक प्रोडक्ट्स.इतर: मसाले, ॲल्युमिनियम आणि रिफाइंड कॉपर बिलेट्स.

एप्रिल-डिसेंबर २०२५-२६ ची आकडेवारी

चीनला एकूण निर्यात: ३६.७% वाढून १४.२४ अब्ज डॉलर.चीनकडून आयात: १३.४६% वाढून ९५.९५ अब्ज डॉलर.व्यापार तूट: ८१.७१ अब्ज डॉलर (भारताच्या बाजूनं अजूनही मोठं असंतुलन).

भारत-चीन व्यापाराचा संदर्भ

अमेरिका नंतर चीन हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अलिकडच्या वर्षांत भारताने इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोलियम उत्पादनं आणि कृषी-सागरी उत्पादनांच्या बाबतीत चीनच्या बाजारपेठेत आपलं स्थान मजबूत केलं आहे. मात्र, आयातीच्या तुलनेत निर्यात अजूनही खूप कमी आहे, ज्यामुळे व्यापार तूट सतत वाढत आहे. निर्यातीतील ही वेगवान वाढ 'मेक इन इंडिया', 'आत्मनिर्भर भारत' आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाढता सहभाग दर्शवते. तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स आणि सागरी उत्पादनं या क्षेत्रांतील हा वेग कायम राहिल्यास येणाऱ्या काळात निर्यात आणखी मजबूत होऊ शकते.

वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चीन भारतासाठी एक महत्त्वाच्या निर्यात बाजारपेठ म्हणून सातत्यानं समोर येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान, चीनला होणारी भारताची निर्यात ३३ टक्क्यांच्या वाढीसह १२.२२ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली. ही वाढ भारत-चीन द्विपक्षीय व्यापारात होत असलेल्या एका रचनात्मक बदलांना दाखवते, जिथे चीनसोबतच्या व्यापारी संबंधांमध्ये निर्यातीची भूमिका हळूहळू मजबूत होताना दिसत आहे.

 

टॅग्स :भारतचीनव्यवसाय