Join us

चिप बनविणारे उद्योग नोकऱ्या देणार नाहीत, रघुराम राजन यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 05:56 IST

Navi Delhi: सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी मांडले.

नवी दिल्ली  - सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी मांडले.

चिप उद्योगासाठी अलिकडेच सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या. त्यावर राजन म्हणाले की, सरकार शिक्षणावर वर्षभरात खर्च केल्या जाणाऱ्या पैशांपेक्षा अधिक रक्कम चिपसाठीच्या अनुदानावर खर्च करत आहे. यापेक्षा अनेक महत्त्वाची कामे करावयाची आहेत. कॉलेजात सायन्स शिकणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. चिपच्या उद्योगात जादा कामगारांची गरज भासत नाही. भारताला अधिकाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांची सध्या गरज आहे.  

टॅग्स :रघुराम राजनव्यवसाय