Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दिवाळीत चीनला 1.25 लाख कोटींचा फटका; भारतीयांची चिनी वस्तूंकडे पाठ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 18:13 IST

Chinese Product Ban : यंदाच्या दिवळील ग्राहक 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदी करण्यावर भर देत आहेत.

Chinese Product Ban : गेल्या काही वर्षांपासून दिवाळीसह इतर सणांच्या दिवसी भारतीय बाजारपेठेत चिनी उत्पादनांची मागणी सातत्याने कमी होत आहे. विशेषत: चिनी सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीत पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कमी मागणीमुळे आयातही कमी होत आहे. त्यामुळेच देशांतर्गत वस्तूंची विक्री वाढून, देशातील व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वोकल फॉर लोकल' मोहिमेचा प्रभाव आता देशात दिसून येत आहे. चिनी वस्तूंच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. यंदा दिवाळीत बहुतांश लोक स्वदेशी वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. विशेषत: लोक 'मेड इन इंडिया' पाहूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करत आहेत.

चिनी उत्पादनांना विरोधएका अंदाजानुसार, दिवाळीशी संबंधित चिनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाल्याने चीनला सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिनी उत्पादनांवर दिवाळीवर बहिष्कार टाकला जातो. कुंभारांकडून मातीचे दिवे घेणे, मेड इ इंडिया आकाशदिवे, लाईटच्या माळा आणि इतर सजावटीच्या वस्तू खरेदी करून लोक 'वोकल फॉर लोकल' मोहीम पुढे नेण्यात मदत करत आहेत.

व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) देशभरातील व्यावसायिक संघटनांना त्यांच्या भागातील महिला, कुंभार, कारागीर आणि दिवाळीशी संबंधित वस्तू बनवणाऱ्या इतरांची विक्री वाढवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे लोकांमध्ये जागरुकता वाढली असून, ते घरगुती उत्पादनांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे चीनचे सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :दिवाळी 2024भारतचीन