China's Secret Gold Strategy : जागतिक अर्थकारणात सध्या चीनने एक अशी शांत पण अत्यंत प्रभावी खेळी खेळली आहे, ज्याने अमेरिकेच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला हादरवून सोडले आहे. एकीकडे चीनची मध्यवर्ती बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना' सातत्याने सोन्याची खरेदी करत आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे सरकारी कर्ज वेगाने विकून आपला हिस्सा कमी करत आहे. चीनची ही 'डी-डॉलरायझेशन' रणनीती डॉलरच्या वर्चस्वाला थेट आव्हान मानली जात आहे.
सोन्याचा साठा ७ कोटी औंसच्या पार!चीनच्या मध्यवर्ती बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी अखेरपर्यंत त्यांचा सुवर्ण साठा वाढून ७४.१९ दशलक्ष (७.४१ कोटी) फाइन ट्रॉय औंस इतका झाला आहे. डिसेंबरमध्ये हा साठा ७४.१५ दशलक्ष औंस होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे, चीनच्या सुवर्ण साठ्याचे मूल्य एकाच महिन्यात ३१९.४५ अब्ज डॉलरवरून थेट ३६९.५८ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या मते, चीनच्या एकूण परकीय चलन साठ्यात आता सोन्याचा वाटा ९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
अमेरिकन कर्जातून चीनची माघार
- चीन केवळ सोने खरेदी करत नाहीये, तर अमेरिकन मालमत्तांपासून हळूहळू लांब जात आहे.
- ट्रेझरी बॉण्ड्सची विक्री : गेल्या एका वर्षात चीनने अमेरिकेच्या सरकारी कर्जातील आपला हिस्सा १० टक्क्यांनी कमी केला आहे. ऑक्टोबरपर्यंत ही गुंतवणूक ६८८.७ अब्ज डॉलरवर खाली आली आहे.
- बँकांना इशारा : चिनी नियामकांनी आपल्या बँकांना अमेरिकन बॉण्ड्समधील गुंतवणूक कमी करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून भविष्यातील जागतिक अस्थिरतेचा फटका बसणार नाही.
सोन्याचा भाव १०,००० डॉलरवर जाणार?सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,००० डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे. यावर्षी आतापर्यंत सोन्यात १७ टक्क्यांची तेजी आली आहे. भौगोलिक-राजकीय तणाव, शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि एआय पायाभूत सुविधांवरील खर्च पाहता, या दशकाच्या अखेरीस सोने १०,००० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते, असा दावा 'यर्डेनी रिसर्च'ने केला आहे.
वाचा - चांदीचा दर वधारला! १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी 'हे' आहेत ३ जबरदस्त प्लॅन, कुठे सर्वाधिक फायदा?
चीनच्या या रणनीतीमागची ३ प्रमुख कारणे
- डॉलवरील अवलंबित्व कमी करणे : पाश्चात्य देशांच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी चीन डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे.
- देशांतर्गत संकट : चीनमधील रिअल इस्टेट मार्केट संकटात आहे. मालमत्ता बाजार आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे चिनी गुंतवणूकदार सोन्याला 'सुरक्षित गुंतवणूक' मानत आहेत.
- आशियाई बाजाराचा प्रभाव : आता सोन्याच्या किमती न्यूयॉर्कऐवजी 'शांघाय फ्युचर्स एक्सचेंज' मधील हालचालींवरून ठरू लागल्या आहेत.
Web Summary : China's increasing gold reserves and decreasing US debt holdings challenge the dollar's dominance. This 'de-dollarization' strategy, driven by factors like domestic economic concerns and a shift in Asian market influence, could see gold prices soaring to $10,000 per ounce.
Web Summary : चीन का बढ़ता स्वर्ण भंडार और अमेरिकी ऋण होल्डिंग्स में कमी डॉलर के प्रभुत्व को चुनौती देती है। घरेलू आर्थिक चिंताओं और एशियाई बाजार के प्रभाव में बदलाव जैसे कारकों से प्रेरित यह 'डी-डॉलरीकरण' रणनीति सोने की कीमतों को 10,000 डॉलर प्रति औंस तक पहुंचा सकती है।