America-China News: अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, चीन अमेरिकेतील मालमत्तांमधील आपली गुंतवणूक हळूहळू कमी करत आहे. अमेरिकेची ट्रेझरी, स्टॉक, कॉर्पोरेट आणि इतर बाँड्समधील चीनची गुंतवणूक आता १.५६ ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली आली आहे, जी गेल्या १४ वर्षांतील नीचांकी पातळी आहे. यामध्ये बेल्जियममधील अमेरिकन ट्रेझरी होल्डिंग्सचाही समावेश आहे, जे चीनचं कस्टोडियल अकाउंट्स असल्याचं मानलं जातं.
जर बेल्जियमची ट्रेझरी वगळली, तर अमेरिकन मालमत्तांमधील चीनची गुंतवणूक १.१६ ट्रिलियन डॉलर उरली आहे, जी २००८ नंतरची सर्वात कमी आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या ट्रेझरीमधील चीनची होल्डिंग ६.१ अब्ज डॉलरनं घसरून ६८२.६ अब्ज डॉलरवर आली आहे. रशिया-यूक्रेन युद्धानंतर चीननं आपल्या बँकांना अमेरिकन ट्रेझरीमधील होल्डिंग विकण्यास सांगितलं आहे.
'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा चांदी खरेदीचा सल्ला: डॉलरबाबत पुन्हा दिला मोठा इशारा
चीनचा गोल्ड रिझर्व्ह
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन गुप्तपणे आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी चीननं २७ टन सोनं खरेदी केलं असलं तरी, तज्ज्ञांच्या मते ही खरेदी सुमारे २७० टन इतकी मोठी असू शकते. चीन अशा प्रकारे सोन्याची साठवणूक करत आहे जणू काही मोठं संकट येणार आहे. अधिकृतपणे चीनकडे २,३०४ टन सोन्याचा साठा आहे, मात्र तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की प्रत्यक्ष साठा यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, जर चीनला येत्या काही दशकांत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचं असेल, तर त्यांच्याकडे ८,००० टनांहून अधिक सोनं असणं आवश्यक आहे.
जागतिक स्तरावरील सोन्याच्या साठ्याची स्थिती
सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेकडे सर्वाधिक ८,१३३ टन सोने आहे, जे त्यांच्या एकूण रिझर्व्हच्या ७८% आहे. गेल्या २५ वर्षांत अमेरिकेच्या सुवर्ण साठ्यात फारसा बदल झालेला नाही. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीकडे ३,३५० टन सोनं असून ते त्यांच्या एकूण रिझर्व्हच्या ७८% आहे. इटलीकडे २,४५२ टन (७५%), फ्रान्सकडे २,४३७ टन आणि रशियाकडे २,३३० टन सोन्याचा साठा आहे. यानंतर चीनचा क्रमांक लागतो, मात्र चीनच्या एकूण रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा केवळ ७% आहे, तर जागतिक सरासरी २२% इतकी आहे.
Web Summary : Amid trade tensions, China is reducing US investments, reaching a 14-year low. They're also increasing gold reserves, potentially aiming for 8,000 tons to become a leading economy. The US holds the largest gold reserves, followed by Germany.
Web Summary : व्यापार तनाव के बीच, चीन अमेरिका में निवेश कम कर रहा है, जो 14 साल के निचले स्तर पर है। वे सोने का भंडार भी बढ़ा रहे हैं, संभावित रूप से एक अग्रणी अर्थव्यवस्था बनने के लिए 8,000 टन का लक्ष्य रख रहे हैं। अमेरिका के पास सबसे बड़ा सोने का भंडार है, उसके बाद जर्मनी का स्थान है।