Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना १५व्या मजल्यावरून फेकले; जोडप्याला देणार विषारी इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 08:49 IST

China Crime News: चीनने बुधवारी एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकले होते. हा एक अपघात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

बिजींग - चीनने बुधवारी एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकले होते. हा एक अपघात असल्याचा दावा त्यांनी केला होता. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, आता या जोडप्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंड देण्यात येणार आहे.झांग बो आणि ये चेंगचेन अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. झांगने त्याची गर्लफ्रेंड ये चेंगचेन हिच्या मदतीने दोन्ही मुलांना खाली फेकले होते. ये चेंगचेनला मुलांचा सांभाळ करायचा नव्हता त्यामुळे तिने झांगला मुलांना मारायला सांगितले.

टॅग्स :चीनगुन्हेगारी