Join us
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel च्या किमतीत झालाय का बदल? 'या' मोठ्या शहरात ₹१०७.४६ मध्ये विकलं जातंय पेट्रोल, पटापट पाहा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:05 IST

Petrol Diesel Price Today: सरकारने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली आहे. पाहा काय आहेत प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर.

Petrol Diesel Price Today: सरकारने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली आहे. मात्र, याचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना मिळणार नाही. यामुळेच आज २८ मार्च २०२६ रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारनं गुरुवारी पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी १३ रुपयांवरून ३ रुपये आणि डिझेलवरील १० रुपयांची एक्साईज ड्युटी शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला होता.

पेट्रोलचे आजचे दर (प्रति लिटर)

दिल्ली: ९४.७७ रुपयेचेन्नई: १०१.२३ रुपयेमुंबई: १०३.५४ रुपयेकोलकाता: १०३.५४ रुपयेहैदराबाद: १०७.४६ रुपये

डिझेलचे दर (प्रति लिटर)

दिल्ली: ८७.६७ रुपयेमुंबई: ९०.०३ रुपयेकोलकाता: ९२.३९ रुपयेहैदराबाद: ९५.७० रुपये

परदेशी गुंतवणूकदारांच्या रेकॉर्ड विक्रीने शेअर बाजारात हाहाकार, मार्च मध्ये १ लाख कोटींचे शेअर्स विकले

नायरा एनर्जीकडून दरवाढ

देशातील नायरा एनर्जीनं बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. तेल कंपनीनं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५.३० रुपये आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ केली. कंपनीनं वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला आहे.

एक्सपोर्ट टॅक्समध्ये वाढ

सरकारनं डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर २१.५० रुपये आणि विमान इंधनावर (ATF) प्रति लिटर २९.५० रुपये निर्यात शुल्क (विंडफॉल टॅक्स) लावलं आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रिफायनरी कंपन्यांच्या अकल्पित नफ्यावर लगाम लावण्यासाठी जुलै २०२२ मध्ये पहिल्यांदा हा कर लावण्यात आला होता, जो डिसेंबर २०२४ मध्ये हटवण्यात आला होता.

कच्च्या तेलाच्या किमतीत 'भडका'

युद्धामुळे क्रूड ऑईलचे दर गगनाला भिडलेत. गेल्या महिन्यात जे कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळ होतं, ते आता ११० डॉलरच्या पार गेलं आहे. यामुळे तेल कंपन्यांवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढलाय.

English
हिंदी सारांश
Web Title : Petrol, Diesel Prices Stable: Check Latest Rates in Major Cities

Web Summary : Despite excise duty cuts, petrol and diesel prices remain unchanged today. Nayara Energy increased prices. The government re-imposed export taxes on diesel and aviation fuel following a surge in crude oil prices, now exceeding $110 per barrel.
टॅग्स :पेट्रोलडिझेलपैसादर वाढ