Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओकॉन घोटाळ्यात चंदा कोचर दोषी; राजीनामा नाही निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 20:01 IST

बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे.

नवी दिल्ली : व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना लाच घेतल्याच्या आरोपाखाली आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांनी राजीनामा दिलेला असताना स्वतंत्र समितीच्या चौकशीमध्ये त्या दोषी आढळल्या आहेत. यामुळे कोचर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसून त्या राजीनाम्याला निलंबन मानण्यात येणार आहे. 

बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. बँकेच्या संचालकांनी कोचर यांनी दिलेला राजीनामा म्हणून न स्वीकारता ते निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांना नोकरी पश्चात सेवांचा फायदा मिळणार नसून बोनसही मिळू शकणार नाही. 

चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी पदाचा ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी संचालक मंडळाकडे लवकरात लवकर निवृत्ती देण्याची मागणी केली होती. ही मागणी मंजूर करण्य़ात आली आहे. 

चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने याच महिन्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच तिचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधतही गुन्हा दाखल केला आहे. कोचर यांनी व्हिडिओकॉनला नियम डावलून 3250 कोटींचे कर्ज दिले होते. 

टॅग्स :चंदा कोचरआयसीआयसीआय बँकगुन्हा अन्वेषण विभाग