Join us

Cement Price Hike: सामान्यांना झटका! घर बांधणे महागणार, सिमेंटच्या किमतीत 'इतकी' वाढ होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:55 IST

Cement Price Hike : मागील एका वर्षात सिमेंटचे दर 390 रुपयांवर पोहोचले आहेत. आता यात आणखी मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Cement Price Hike : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर सर्व वस्तू महागल्या आहेत. महागाईत दररोज वाढ होताना दिसत आहेत. तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला मोठा झटका बसणार आहे. स्टीलनंतर आता सिमेंटच्या दरात प्रति बॅग 25 ते 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन संकटामुळे आता कंपन्या वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याच्या तयारीत आहेत. 

सिमेंटची किंमत 435 रुपयांपर्यंत जाऊ शकतेरेटिंग एजन्सी क्रिसिलने सांगितल्यानुसार, गेल्या एका वर्षात सिमेंटची किंमत प्रति बॅग 390 रुपये झाली आहे. आता यात आणखी 25 ते 50 रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच, सिमेंटचा भाव प्रति बॅग 435 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. सिमेंटच्या दरात वाढ झाल्यानंतर घर बांधण्याचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मालवाहतुकीचे शुल्क वाढलेक्रिसिलने सांगितले की, मार्चमध्ये कच्च्या तेलाने प्रति बॅरल $115 पार केले होते. दुसरीकडे कोळशाचे दरही वाढले आहेत. इंडोनेशियातून कोळसा निर्यातीवर बंदी आल्याने सिमेंटची मागणी वाढली आहे. वीज आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने मालवाहतुकीचे शुल्कही वाढले आहे. 50 टक्के सिमेंटची वाहतूक फक्त रस्त्यांवरून होते.  

टॅग्स :सुंदर गृहनियोजनमहागाई