तुम्ही तुमच्या कारचे कर्ज पूर्णपणे फेडलं असेल आणि तुमच्या गाडीच्या आरसी (Registration Certificate) वर बँक किंवा फायनान्सरचं नाव असेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. सरकारनं वाहन मालकांना मोठा दिलासा देत 'हायपोथेकशन टर्मिनेशन' म्हणजेच कर्जाची नोंद हटवण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. आता तुम्ही हे काम आरटीओ (RTO) मध्ये न जाता मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे घरबसल्या करू शकता.
हायपोथेकशन म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती कर्जावर कार खरेदी करते, तेव्हा आरसीमध्ये 'हायपोथेकशन' क्लॉज जोडलेला असतो. याचा अर्थ असा की ते वाहन बँक किंवा फायनान्सरकडे गहाण आहे. कर्ज फेडल्यानंतरही ही नोंद हटवली नाही, तर सरकारी दप्तरी गाडीवर बँकेचाच अधिकार राहतो. यामुळे भविष्यात गाडी विकताना, ट्रान्सफर करताना किंवा पुन्हा नोंदणी करताना अडचणी येऊ शकतात.
आता ऑनलाइन हटणार हायपोथेकशन नोंद
परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट VAHAN (vahan.parivahan.gov.in) द्वारे आता हायपोथेकशन हटवण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहे. अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे, तर काही राज्यांमध्ये 'फॉर्म ३५' ऑनलाइन भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी आरटीओ आणि कर्ज देणाऱ्या संस्थेत जमा करावी लागू शकते.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?
ऑनलाइन हायपोथेकशन हटवण्यासाठी खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील:
बँक किंवा फायनान्सरकडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र (NOC)आरटीओ फॉर्म ३५ (RTO Form 35)वैध विमा प्रमाणपत्र (Insurance Certificate)वाहनाची मूळ आरसी (Original RC)
स्टेप-बाय-स्टेप ऑनलाइन प्रक्रिया
१. VAHAN वेबसाइटवर लॉगइन करा. २. “Online Services” मध्ये जाऊन “Vehicle Related Services” निवडा. ३. रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबर टाकून OTP जनरेट करा. ४. OTP टाकल्यानंतर “Hypothecation Termination” पर्याय निवडा. ५. विम्याचा तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. ६. निर्धारित फी ऑनलाइन जमा करा.
हायपोथेकशन हटवण्याचे फायदे
जर तुम्हाला कार विकायची असेल किंवा मालकी हक्क हस्तांतरित करायचा असेल, तर हायपोथेकशन हटवणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या आरसीवरून बँकेचा दावा संपुष्टात येतो आणि गाडी पूर्णपणे तुमच्या मालकीची असल्याचं स्पष्ट होतं.
Web Summary : Clear your car loan? Remove hypothecation online via VAHAN website. Upload NOC, Form 35, insurance, RC copy. Avoid RTO hassles, simplify vehicle transfer.
Web Summary : कार लोन चुकाने के बाद हाइपोथेकशन ऑनलाइन हटाएं। वाहन वेबसाइट पर एनओसी, फॉर्म 35 और आरसी अपलोड करें। आरटीओ जाने से बचें, स्वामित्व आसान बनाएं।