टेक जायंट Apple नं अखेर आयफोन १७ सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. परंतु त्यांच्या किंमतीनं सामान्य ग्राहकांना आश्चर्यचकित केलंय. सर्वात प्रीमियम मॉडेलची सुरुवातीची किंमत २ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न असा आहे की दोन आयफोन १७ खरेदी करण्याऐवजी सामान्य माणूस कोणत्या आवश्यक गोष्टी आरामात खरेदी करू शकतो.
जर तुम्ही दोन आयफोन १७ (सुमारे ४ लाख) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच पैशानं तुम्ही अनेक मोठी स्वप्नं पूर्ण करू शकता. उदाहरणार्थ- ४ लाख रुपयांमध्ये मारुती सुझुकी अल्टो के १० किंवा रेनो क्विड सारखी कार तुम्हाला खरेदी करता येईल. इतकंच काय तर सध्याच्या दरानुसार ३०-४० ग्रॅम सोनंही तुम्ही खरेदी करू शकता.
शैक्षणिक खर्च : एक चांगल्या खासगी महाविद्यालयात २ वर्षांची फी किंवा परदेशात शॉर्ट टर्म कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता.
होम फर्निचर : पूर्णपणे नवीन एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसीचा कॉम्बो पॅक खरेदी करून घर अपग्रेड केलं जाऊ शकतं.
ट्रॅव्हल : १०-१२ दिवसांची युरोप किंवा अमेरिकेचा प्रवास ४ लाखांमध्ये आरामात होऊ शकतो.
हे तुमच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे ज्यात तुम्ही हे बजेट कसं वापरायचं हे ठरवू शकता. मग तुम्ही दोन iPhone 17 Pro Max निवडाल की वर दिलेल्या पर्यायांपैकी काही एक.
किती आहे किंमत?
iPhone 17 Pro Max च्या 256GB ची किंमत १,४९,९०० रुपये
iPhone 17 Pro Max च्या 512GB ची किंमत १,६९,९०० रुपये
iPhone 17 Pro Max च्या 1TB ची किंमत १,८९,९०० रुपये
iPhone 17 Pro Max च्या 2TB ची किंमत २,२९,९०० रुपये