Join us

विवाहित बहीण आपल्या भावाच्या मालमत्तेवर कधी हक्क सांगू शकते? कायदा काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:22 IST

married sister claim her brothers property : कायद्यानुसार, पालक स्वतःच्या कमाईतून मिळवलेली संपूर्ण संपत्ती आपल्या विवाहित मुलीला देऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा म्हणजेच मुलीचा भाऊ काहीही करू शकत नाही.

Property laws in India : देशातील कोणत्याही न्यायालयात गेला, तरी सर्वाधिक खटले हे मालमत्तेशी संबंधित आढळतील. मालमत्तेशी संबंधित वादांचा देशाला मोठा इतिहास आहे. आजही मालमत्तेशी संबंधित वादाच्या अनेक बातम्या पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतात. कधीकधी हे वाद इतके विकोपाला जातात की रक्ताची नाती ऐकमेकांच्या जीवावर उठतात. मालमत्तेशी संबंधित वादाचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या देशातील अनेक लोकांना मालमत्तेशी संबंधित कायद्यांची माहिती नाही. अशाच एका कायद्याची आज आपण माहिती घेणार आहोत. विवाहित बहीण तिच्या भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते का?

लग्न झाल्यानंतर बहिणीचा आईवडिलांच्या मालमत्तेतील हक्क संपतो?मालमत्तेत बहिणी आणि मुलींच्या वाट्याबाबत विविध नियम आणि कायदे आहेत. कायद्यानुसार, आईवडिलांनी स्वतःच्या कमाईतून मिळवलेली संपत्ती कोणालाही द्यायचा अधिकार आहे. म्हणजे आईवडिलांनी ठरवलं की संपूर्ण मालमत्ता मुलीच्या नावावर करायची आहे. तर यामध्ये मुलाला कुठलाही आक्षेप घेता येत नाही. पालक ही संपत्ती मुलगा किंवा मुलगी कोणलाही देऊ शकतात. पण, वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत, भाऊ आणि बहिणीचा त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा असतो.

अशा परिस्थितीत बहीण संपूर्ण मालमत्तेवर हक्क सांगू शकतेहिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ नुसार, विवाहित बहीण तिच्या भावाच्या मालमत्तेवर काही विशिष्ट परिस्थितींमध्ये दावा करु शकते. कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न करता झाला असेल. अशा परिस्थितीत वर्ग १ चे वारसदार पत्नी, मुलगा किंवा मुलगी असे कोणीही नसेल. तर अशा स्थितीत त्या व्यक्तीची बहीण (वर्ग II दावेदार) तिच्या भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते. अशा परिस्थितीत भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार कायद्याने बहिणीला देण्यात आला आहे. 

टॅग्स :न्यायालयबांधकाम उद्योग