Join us
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांची खरेदी करताय? खरेदीत होणारी फसवणूक आता टळणार; नव्या तरतुदींचा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 07:02 IST

दिशाभूल करणाऱ्या शब्दांवर बंदी, लॅब हिऱ्यांसाठी स्पष्ट उल्लेख

भारतीय बाजारपेठेत दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. हिरे खरेदीमध्ये होणारी दिशाभूल आणि फसवणूक टाळण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आता कडक नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमानुसार, खाणीतून मिळालेल्या हिऱ्यालाच 'डायमंड' म्हणता येणार आहे.

प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे व नैसर्गिक हिरे यांच्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम होता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चुकीच्या नावांनी विक्री केली जात होती. यावर उपाय म्हणून बीआयएसने नवी ‘आयएस १९४६९:२०२५’ ही मानके लागू केली आहेत.

नव्या नियमावलीतील महत्त्वाच्या तरतुदी

दिशाभूल करणाऱ्या शब्दांवर बंदी

  • प्रयोगशाळेतील हिऱ्यांसाठी 'शुद्ध', 'इको-फ्रेंडली' किंवा 'कल्चरड' असे शब्द वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • 'डायमंड' शब्द नैसर्गिक हिऱ्यांसाठीच वापरता येईल. त्यासाठी 'रियल' किंवा 'नॅचरल' असे शब्द जोडता येतील.

लॅब हिऱ्यांसाठी स्पष्ट उल्लेख

प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांसाठी 'लॅबोरेटरी-ग्रोन डायमंड' असा पूर्ण उल्लेख करणे बंधनकारक असेल. ‘एलजीडी’ किंवा 'लॅब-डायमंड' असे शॉर्टफॉर्म वापरता येणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : New rules protect diamond buyers from fraud, ensure clarity.

Web Summary : New BIS rules safeguard diamond buyers. 'Diamond' now strictly for mined stones. Lab-grown diamonds require full disclosure, banning misleading terms. 'Laboratory-grown diamond' must be explicitly stated, preventing consumer confusion.
टॅग्स :सोनं