Electric Scooter vs Petrol Scooter: बाजारपेठेत आता एक स्पष्ट आणि मजबूत कल दिसून येत आहे. ज्या ई-स्कूटर काही वर्षांपूर्वीपर्यंत महागड्या आणि मर्यादित ग्राहकांसाठी मानल्या जात होत्या, त्या आता पेट्रोल स्कूटरच्या किमतीच्या आसपास आल्या आहेत. ८५ ते ९५ हजार रुपयांच्या श्रेणीत बजाज, टीव्हीएस आणि हीरो मोटोकॉर्प सारख्या मोठ्या कंपन्यांच्या किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्या आहेत. हे या गोष्टीचे संकेत आहेत की, ईव्ही आता मुख्य प्रवाहाकडे वेगाने वाटचाल करू शकते.
नुकतेच बजाज ऑटोने चेतक सिरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल 'Chetak C25 01' सुमारे ९१ हजार रुपयांत लाँच केले आहे. टीव्हीएस आणि हीरो मोटोकॉर्प आधीच या श्रेणीत आपल्या स्वस्त ई-स्कूटर सादर करून स्पर्धेत आहेत. याची थेट स्पर्धा आता केवळ दुसऱ्या ई-स्कूटरशी नसून पेट्रोल स्कूटरशी होत आहे. ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही किमतीची पातळी ईव्हीचा स्वीकार वाढवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. जेव्हा ग्राहकासमोर ९० हजार रुपयांत पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असे दोन्ही पर्याय असतात, तेव्हा तो खर्च, मेंटेनन्स आणि भविष्य पाहून निर्णय घेतो. अशा स्थितीत ई-स्कूटर प्रबळ दावेदार ठरते, कारण यात इंधनाचा खर्च नगण्य असतो आणि सर्व्हिसिंगही स्वस्त पडते.
५ वर्षात ३०००% रिटर्न, ₹३.५ लाखांचे झाले १ कोटी ८ लाख; आता का मारतोय हा शेअर अपर सर्किट?
प्रीमियम फीचर्स केले सोपे
बजाज चेतक C25 01 हे याचं ताजं उदाहरण आहे. किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी यात काही प्रीमियम फीचर्स सोपे करण्यात आले आहेत. यामध्ये २.५ kWh ची बॅटरी, ११३ किमीची रेंज (कंपनीचा दावा), एलईडी लाईट्स, २५ लिटरची स्टोरेज क्षमता आणि बेसिक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
असाच विचार इतर कंपन्यांमध्येही दिसून येत आहे. टीव्हीएसनं आपल्या 'आयक्युब'च्या (iQube) माध्यमातून स्वस्त सेगमेंटमध्ये मजबूत स्थान निर्माण केलं आहे, तर हीरो मोटोकॉर्पनं 'VIDA' सिरीजचे दर कमी करून ही स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.
काही आव्हानं अजूनही कायम
किफायतशीर किमती असूनही काही आव्हानं अजूनही शिल्लक आहेत. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही सर्व ठिकाणी मजबूत नाही. बॅटरीचं लाईफ आणि रिसेल व्हॅल्यूबाबतही ग्राहक अजून पूर्णपणे साशंक आहेत. मात्र, किमतीच्या पातळीवर जो बदल झाला आहे, तो या चिंतांना बऱ्याच अंशी संतुलित करत आहे. एकूणच, पेट्रोल स्कूटरच्या किमतीत इलेक्ट्रिक स्कूटरचं येणं हा उद्योगासाठी एक 'टर्निंग पॉईंट' मानला जाऊ शकतो.
Web Summary : Electric scooters are nearing petrol scooter prices, driven by Bajaj, TVS, and Hero MotoCorp. Chetak C25 01 at ₹91,000 makes EVs attractive due to lower running costs. Charging infrastructure and battery life remain challenges, but price parity marks a turning point.
Web Summary : बजाज, टीवीएस और हीरो मोटोकॉर्प के कारण इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटर की कीमतों के करीब आ रहे हैं। ₹91,000 में चेतक C25 01 कम चलने वाले खर्च के कारण ईवी को आकर्षक बनाता है। चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर और बैटरी लाइफ चुनौतियां हैं, लेकिन कीमत समानता एक महत्वपूर्ण मोड़ है।