Join us  

PM मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गौतम अदानी तयार, बनवला 5 लाख कोटींचा मेगा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:29 PM

गौतम अदानी यांनी म्हणाले आहे, की अदानी समूह ही जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असेल. ही कंपनी जगातील सर्वात कमी किंमतीत हायड्रोजनचे उत्पादन करेल. यासाठी हा समूह पुढील 10 वर्षांत 70 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी, नुकत्याच झालेल्या हवामान बदलासंदर्भातील परिषदेत भारताला 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन असलेला देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच भारत 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेच्या सहाय्याने आवश्यक असलेल्या उर्जेच्या 50 टक्के गरज पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करत आहोत, असेही मोदींनी म्हणाले होते. यानंतर आता, अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांनी देशाला हरित ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने पुढील दहा वर्षांसाठी 70 अब्ज डॉलर म्हणजेच 5 लाख कोटींहून अधिकचा मेगा प्लॅन तयार केला आहे. (Gautam adani to invest 70 billion dollar in renewable energy)

गौतम अदानी यांनी म्हणाले आहे, की अदानी समूह ही जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असेल. ही कंपनी जगातील सर्वात कमी किंमतीत हायड्रोजनचे उत्पादन करेल. यासाठी हा समूह पुढील 10 वर्षांत 70 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही सध्या जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा निर्माता कंपनी आहे. 2030 पर्यंत 45 GW अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, 2022-23 पर्यंत, कंपनी दरवर्षी 2 GW सौर ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेवर 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल.

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी वीज पारेषण कंपनी -अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ही सध्या भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी वीज पारेषण कंपनी आहे. सध्या वीज प्राप्तीत अक्षय ऊर्जेचा वाटा 3 टक्के आहे. 2023 पर्यंत हे प्रमाण 30 टक्के आणि 2030 पर्यंत 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ब्लूमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना गौतम अदानी म्हणाले, की अक्षय ऊर्जा एवढी स्वस्त व्हावी, की तिने फॉसिल्स इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलची जागा घ्यावी, असे त्यांचे स्वप्न आहे.

टॅग्स :अदानीव्यवसायनरेंद्र मोदी